Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kolhapur News : भावाला लोकोशन पाठवून शेतात बोलावले; समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 July 2023, 17:55

Kolhapur News : कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याने आपल्या भावाला लोकेशन पाठवून शेतातच पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील इस्पुर्ली गावात ही घटना घडली.

करवीर तालुक्यातील इस्पुर्ली गावातील घटना

या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. राहुल राजाराम परीट (वय २३) आणि अनुष्का राहुल परीट (वय २१) असे मृत दांपत्याचे नाव आहे. या दोघांचे प्रेमसंबंध होते. प्रथम घरच्यांचा विवाहाला विरोध होता. मात्र, कालांतराने दोघांच्याही कुटुंबाने विवाहास मान्यता दिली. जानेवारी महिन्यात हा आंतरजातीय प्रेम विवाह झाला. (Kolhapur News) मात्र, काल अचानक त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असून, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

राहुल परीट याची काही दिवसांपूर्वी कागल तालुक्यातील सावर्डे या गावात महावितरणमध्ये वायरमन म्हणून बदली झाली होती. अनुष्का ही कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बुधवारी (ता. २७) सकाळी अनुष्काला कॉलेजला सोडून कामावर जातो असे सांगत दोघेही व्हनगुत्ती येथून घराबाहेर पडले. रात्री दहा वाजता आपण कोल्हापुरातच थांबणार असल्याचे सांगितले. (Kolhapur News) सकाळी साडेनऊच्या सुमारास राहुलने आपल्या वडिलांना घरी येत असल्याचे सांगितले. यानंतर तो मित्रासोबत सोशल मीडियावर चॅटिंग करत बसला.

 

याच दरम्यान, त्याने आपल्या चुलत भावाला इस्पुर्ली येथील लोकेशन पाठवले आणि फोन बंद केला. बराच वेळ झाला तरी राहुल घरी परतला नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला फोन लावला. दरम्यान, राहुलने पाठवलेल्या लोकेशनच्या आधारे शोध घेतला असता इस्पुर्ली येथे एका शेतात पत्र्याच्या शेडजवळ राहुलची मोटरसायकल सापडली. शेडमध्ये गेले असता दोघांनीही ओढणी आणि साडीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. (Kolhapur News) आत्महत्या करण्यापूर्वी राहुल याने मित्र मंडळींच्या व्हॉटस् ॲपवर I am sorry असा संदेश पाठविला होता.

राहुल परीट हा मनमिळावू स्वभावाचा होता. सात-आठ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपली फसवणूक झाल्याची चिठ्ठी कुटुंबीय व इतरांना पाठविली होती, असे सांगण्यात आले. त्याच्या या निर्णयाचा कुटुंबीयांसह, मित्र, ग्रामस्थांना धक्का बसला.

नातेवाईकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले. राहुल आणि अनुष्काने उचललेल्या या टोकाच्या पावलाने कुटुंबाला धक्का बसला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत. (Kolhapur News) आर्थिक फसवणुकीतून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा गावात आहे.

राहुल परीट याने सोशल मीडिया स्टेटसवर वडिलांपेक्षा महत्त्वाचं कोणी नाही आणि आईपेक्षा मोठ कोणी नाही. ‘लव्ह यू सो मच मम्मी अँड पप्पा. आय एम सो सॉरी’ असा मेसेज टाकून आई-वडिलांची माफी मागितली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Kolhapur News : पै पै साठवून घरकूल उभारलं अन् राहत्या घरानंच सगळं हिरावलं… धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं!

Kolhapur News : छत्रपती शिवरायांनी तुळजाभवानीला दिलेले दागिने गहाळ; संभाजीराजेंचा आंदोलनाचा इशारा!

Kolhapur News : हृदयद्रावक! स्पीडब्रेकरवरून दुचाकी घसरली अन् आईच्या डोळ्यांदेखत चिमुकली बसच्या चाकाखाली आली…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Climate News : पूर्व हवेलीत व्हायरलने वाढविला नागरिकांचा 'ताप' ; सर्दी, खोकल्यांच्या रुग्णात वाढ, वातावरणातील बदलाचा परिणाम..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.