उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरणे त्वचेच्या सुरक्षित राहण्यासाठी गरजेचे आहे. मात्र चेहऱ्यावर सनस्क्रीन लावताना काळजीपूर्वक लावणे आवश्यक आहे. तुमच्या निष्काळजीपणामुळे सनस्क्रीन डोळ्यात गेलं तर त्याचे डोळ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
तुम्ही वापरत असलेल्या सनस्क्रीनमध्ये अॅव्होबेन्झोन नावाचा एक घटक असतो. या घटकामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण होते. मात्र हे क्रिम डोळ्यांच्या संपर्कात आल्याने डोळ्यांना खाज सुटते, जळजळ होते. तसेच डोळ्यांतून पाणी येणं, डोळे लालसर होणं अशी सामान्य लक्षणं जाणवतात.
अशी घ्या काळजी
सनस्क्रीन लावण्याअगोदर तुमच्या त्वचेसाठी कोणत्या प्रकारचं सनस्क्रीन चांगलं असेल ते जाणून घ्या. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या किंबहुना त्यांच्या शिफारसीनुसार, मिनरल्स म्हणजेच खनिजं असलेलं सनस्क्रीन, जसं की टायटॅनियम डायऑक्साइड किंवा झिंक ऑक्साईड असलेलं सनस्क्रिन अधिक सुरक्षित असतं ते वापरा. हे सनस्क्रीन त्वचेवर राहतं आणि डोळ्यांत जाण्याची शक्यता कमी असते.