मुंबई : सैफ अली खानवर सात दिवसापूर्वी त्याच्या राहत्या घरात चोराने चाकू हल्ला केला होता. त्यात तो जखमी झाला होता, त्याला लीलावती रग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असून सैफला मंगळवारी (21 जानेवारी)ला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अशातच सैफ त्याचा जीव वाचवणाऱ्या रिक्षा चालकाची भेट घेतल्याचा एक फोटो समोर आला आहे. सोशल मीडियावर सैफ अली खान आणि रिक्षा चालकाच्या भेटीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान मंगळवारी हॉस्पिटलमध्येच रिक्षा चालकाला भेटला होता. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये सैफ पांढरा शर्ट आणि डेनिम जीन्स घातली असून सनग्लासेस लावला आहे. तर रिक्षा चालकाने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला दिसून येत आहे. फोटोमध्ये सैफ रिक्षा चालकाच्या खांद्यावर हात ठेवून बसलेला बघायला मिळत आहे.
अशीच सर्वांना मदत करत राहा
सैफ अली खान आपले जीव वाचवल्याबद्दल रिक्षा चालकाचे आभार मानले आहे. तसेच सैफची आई शर्मिला टागोरनेही रिक्षा चालकाचे आभार मानले आहेत. तसेच नेहमी इतरांना मदत करण्याचे प्रोत्साहन दिले. सैफ अली खानने रिक्षाचालकाच्या कामाचे कौतुक केले. “अशीच सर्वांना मदत करत राहा” असे सैफ म्हणाला. पुढे सैफ म्हणाला की, त्या दिवशीचे भाडे तुम्हाला दिले जाईल. यावर रिक्षा चालक हसत म्हणाला, “आयुष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर माझी आठवण नक्की काढा.”