मुंबई: सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा प्रतिष्ठित सिंगिंग रिॲलिटी शो ‘इंडियन आयडॉल’चा 14वा सीझन एक अपवादात्मक ठरला आहे. ‘द ग्रँड फिनाले’ पर्यंतच्या ऑडिशनपासून टॉप 6 फायनलिस्ट शुभदीप दास चौधरी, अनन्या पाल, आद्या मिश्रा, वैभव गुप्ता, पियुष पनवर आणि अंजना पद्मनाभन यांनी आपल्या प्रतिभेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. परीक्षक कुमार सानू, श्रेया घोषाल आणि विशाल ददलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र अंतिम स्पर्धकांनी त्यांच्या कौशल्यांचा यशस्वीपणे गौरव केला आणि 3 मार्च 2024 रोजी प्रसारित झालेल्या ‘द ग्रँड फिनाले’मध्ये त्यांना योग्यरित्या स्थान मिळालं. पण वैभव गुप्ता याने आपल्या अभूतपूर्व गायन प्रतिभेने देशाची मने जिंकली आणि इंडियन आयडल सीझन 14 ची प्रतिष्ठित ट्रॉफी आपल्या नावावर केली. वैभवने ऑडिशन दरम्यान त्याच्या पॉवरपॅक परफॉर्मन्सने गो या शब्दातून परीक्षकाना प्रभावित केले आणि शोमध्ये सहभागी झालेल्या ख्यातनाम पाहुण्यांकडूनही प्रशंसा मिळवली.
वैभव गुप्ता याला सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन कडून 25 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. त्यांच्या खडतर प्रवासाचे स्मरण म्हणून मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडकडून नवीन ‘हॉट अँड टेकी ब्रेझा’ देखील त्याला देण्यात आली. स्पर्धक शुभदीप दास चौधरी आणि पियुष पनवर यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यांना ट्रॉफी आणि प्रत्येकी 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. अनन्या पाल हिला तिसरी उपविजेती म्हणून घोषित करण्यात आले आणि तिला 3 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
इंडियन आयडॉल हे एक असे व्यासपीठ आहे, ज्याने भारताला काही सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक दिले आहेत. या सीझनमध्ये वैभवसह अनेक स्पर्धकांना पार्श्वगायनाच्या संधी देण्यात आल्या आहेत. अनेक ऑडिशन, गाला राऊंड आणि मनोरंजक परफॉर्मन्सने भरलेल्या तीव्र हंगामानंतर – ‘द ग्रँड फिनाले’ हा एक उत्कृष्ट कार्यक्रम होता. ज्यामध्ये वैभव गुप्ता इंडियन आयडॉल म्हणून विजयी झाला. उज्ज्वल भविष्यासोबत वैभव गुप्ता संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवणार आहे.