मुंबई : ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार विवाहबंधनात अडकली आहे. अमृताने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. अमृताने तिच्या लग्नात नीलसाठी खास उखाणाही घेतला. सध्या तिच्या या उखाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उखाणा घेताना अभिनेत्री अमृता पवार म्हणते कि, ‘पाटलांच्या घरात प्रवेश करुन करणार नवीन संसाराची सुरुवात, नील रावांचं नाव घेते ठेवाल ना मला सुखात?’दरम्यान, अमृताच्या या गोड उखाण्यानंतर सर्व उपस्थित व्यक्तींनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या. तसेच तिचे कौतुकही केले. या उखाण्यानंतर अमृता आणि नील हे दोघेही एकमेकांकडे बघून गोड हसत होते.