लहू चव्हाण
पाचगणी : दैदिप्यमान निकालासाठी परिचित असलेल्या पांचगणी येथील सर आईन्स्टाईन अकादमीचे वार्षिक स्नेहसंमेलन सेंट पीटर हायस्कूलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत रांजणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष विशाल कानडे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, सर आईन्स्टाईन अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक अशपाक खान, कार्यकारी संचालक नाजनीन खान, श्रीरंग पंडित, पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, अकादमीचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना लक्ष्मीकांत रांजणे म्हणाले वैविध्यपुर्ण शैक्षणिक अनुभव देणारी सर आईन्स्टाईन अकादमी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणास तयार करण्याबरोबरच सुजाण नागरिक घडविण्याची जबाबदारी पार पाडत आहे.
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात संगत चांगली ठेवावी,आपले सामान्य ज्ञान वाढवावे व आपले ध्येय निश्चित करून अभ्यास करावा, असे बिलिमोरिया हायस्कूलचे प्राचार्य विशाल कानडे म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य व गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.श्रेया बावळेकर व कु. पारस पार्टे यांनी तर आभार कु.सृष्टी सकपाळ यांनी मानले.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अकादमीचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.