गणेश सुळ
Daund News केडगाव : आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा झपाट्याने वाढत आहे. जणू आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थी फार मागे असलेला पहायला मिळतो. (Daund News) हा ग्रामीण विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेत मागे राहू नये. त्यांची शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, या दृष्टीने राहु (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सामान्य ज्ञान परीक्षांचे आयोजन केले गेले होते. (Daund News) या परीक्षेसाठी तब्बल २५५ विद्यार्धी बसले होते. (Daund News)
राज्यात शालेय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. यामध्ये पाचवी – आठवीच्या टप्प्यावर होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा या सरकारी परीक्षांच्याच जोडीने अनेक स्थानिक स्पर्धा परीक्षांचाही समावेश आहे.
विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा, म्हणून त्यांना शालेय पातळीवरील अशा परीक्षांची तयारी करण्यासाठी पालकांकडूनही प्रोत्साहन दिले जाते. हीच बाब विचारात घेऊन राज्यातील बहुतेक शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर विविध शालेय स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते,.
मुलांच्या शालेय जीवनापासून या परीक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे. या परीक्षांना प्रत्येक विद्यार्थी प्रविष्ठ होणे आवश्यक आहे. यातून पालकांनी / शिक्षकांनी यश अपयश न पाहता विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते. याचा विचार केला पाहिजे. या परीक्षांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहु येथील सर्व अध्यपकाचे तसेच परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
याबाबत बोलताना मुख्याध्यापक शिवदास शिंदे म्हणाले कि, शालेय स्पर्धा परिक्षेमुळे विद्यार्थ्याना वेळेचे नियोजन, उत्तर देण्याची पद्धत व विचारांची अचूकता अशा गोष्टींचे ज्ञान अवगत होते, त्यांची स्मरणशक्ती वाढते. विचारांची क्षमता वाढते. परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढतो. चाकोरी बाहेरचा विचार करणे. यश, अपयश पचविण्याची ताकत निर्माण होते. विविध विषयांचे वाचन वाढते. विद्यार्थ्याचा कल लक्षात येतो. आणि सर्वात महत्वाचे परीक्षेबद्दलची भीती कमी होते. अशा अनेक गोष्टींचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. या दूरदृष्टी कल्पकतेतून हि परीक्षा घेतली जाते.