लोणी काळभोर : बावीस वर्षांपूर्वी शिकत असलेले माजी विद्यार्थी, तीच शाळा, तेच विद्यार्थी, निमित्त होते सस्नेह मेळाव्याचे, थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी विद्या मंदिरातील २००० सालच्या इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा आनंदात आणि थाटामाटात संपन्न झाला.
चिंतामणी विद्या मंदिरातील माजी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र येऊन जुन्या गोष्टींना उजाळा दिला. विद्यार्थी शाळेतील जुन्या आठवणीमध्ये रमून गेले होते. त्याच बरोबर वर्तमान काळात शाळेविषयी श्रद्धा व्यक्त करीत होते. यावेळी विद्यार्थी शिक्षक यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी चिंतामणी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नेवाळे, मुख्याध्यापक बाळासाहेब सोळवंडे, सुरेश महारनवर, शोभा कोतवाल , खरात ,बांगर, भरीत, गायकवाड, शिंपनकर आणि चंदा काळे या शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी मान सन्मान करून सत्कार केला.
दरम्यान, या बॅच तर्फे शाळेच्या रंग-रंगोटी व दुरुस्तीसाठी रोख स्वरुपात ५० हजार रुपये रोख देण्यात आले. तर माजी विद्यार्थी सतीश दिलीप लगड यांनी आई रेखा लगड, शिक्षक संजय सदाशिव यादव ,अर्जुन लक्ष्मण कांचन व माधव धर्माजी साळुंखे तसेच वर्गमित्र निखिल साहेबराव कोतवाल, आणि गोकुळ किसन ढोणे यांच्या स्मरणार्थ शाळेला ५१ हजार रोख रक्कम दिली आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्रीनिवास वाघ, भुषण नाईक ,सुजित कुंजीर ,संदीप धुमाळ, अभिजीत कांबळे ,नितीन तारु, मंदार धुमाळ , अमोल गाढवे , रियाज शेख ,अमोल भिसे यांनी केले आहे. या सुत्रसंचालन थेऊर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रहिमान शेख आणि प्रशांत गुप्ता यांनी केले आहे. सोनाली बांगर, सुवर्णा कांबळे , स्मिता बधे यांनी माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्वागत केले. तर यशवंत बोराळे व अमित साळुंखे आणि ॲड. श्रीकांत भिसे यांनी आभार मानले.