नवी दिल्ली : शेअर मार्केटमध्ये सातत्याने चढउतार दिसून येत आहे. त्यात शुक्रवारी शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले गेले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने लवकरच त्यांच्या रिटेल आउटलेटवर स्टारलिंकशी संबंधित हार्डवेअरची विक्री सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. मुकेश अंबानींची कंपनी घरोघरी स्टारलिंक इंटरनेट सेवा पोहोचवणार आहे.
स्पेसएक्सला देशात काम करण्याची परवानगी मिळताच, लोक स्टारलिंक ब्रॉडबँड सेवा मिळवण्यासाठी जिओ स्टोअरमध्ये जाऊ शकतात. मुकेश अंबानींची कंपनी घरोघरी स्टारलिंक इंटरनेट सेवा पोहोचवणार आहे. अलीकडेच जिओने स्पेसएक्ससोबत एक करार केला होता, ज्यामध्ये जिओने स्टारलिंक ब्रॉडबँड सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याबद्दल सांगितले आहे. एअरटेलनेही स्पेसएक्ससोबत असाच करार केला आहे. स्टारलिंक हार्डवेअर जिओच्या रिटेल स्टोअरमध्ये विकले जाईल, असे सांगण्यात आले आहे.
याशिवाय, मार्च तिमाहीच्या निकालांमध्ये रिलायन्स जिओने चांगली वाढ दाखवली आहे. त्यांचा नफा 17.8 % वाढून 39853 कोटी रुपये झाला. मार्चमध्ये जाहीर झालेला दोन्ही कंपन्यांमधील करार, भारतात स्पेसएक्सला किती लवकर मान्यता मिळते यावर अवलंबून आहे. एकदा मंजूर झाल्यानंतर, देशातील ज्या भागात सध्या इंटरनेट उपलब्ध नाही तेथे इंटरनेट उपलब्ध होणार आहे.