नवी दिल्ली : सध्या Apple चे iPhones चे उत्पादन आणि असेंबल चीनमध्ये अनेक वर्षे चालू राहिले. पण, आता ‘मेक इन इंडिया’ सुरू झाल्यानंतर परिस्थिती बदलू लागली आहे. आयफोनचे उत्पादन भारतात सुरू झाले आणि आता हा ट्रेंड इतका पोहोचला आहे की, भारत चीनऐवजी आयफोनचे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
फॉक्सकॉन ही मोठी आयफोन उत्पादक कंपनी भारतात आयफोनचे उत्पादन दुप्पट करणार आहे. चीनवरील डिपेंडन्सी कमी करून कंपनी इतर ठिकाणी उत्पादन वाढवत असल्याचे सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, फॉक्सकॉन या वर्षाच्या अखेरीस भारतात 25 ते 30 दशलक्ष आयफोन बनवेल. फॉक्सकॉनने गेल्या वर्षी भारतात सुमारे 12 दशलक्ष आयफोन बनवले. काही महिन्यांपासून या प्लांटमध्ये आयफोनचे ट्रायल प्रोडक्शन सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ॲपल आणि फॉक्सकॉन या दोन्ही कंपनीने याबाबत अद्याप माहिती दिली नाही.
2025 मध्ये कंपनीचे उत्पादन 3 कोटींवर नेले तर ते दुप्पट होईल. रिपोर्ट्सनुसार, कंपनीला चीनवरील आपली डिपेंडन्सी कमी करायची आहे, म्हणून ती इतर देशांमध्ये iPhones बनवत आहे. याचा फायदा भारताला झाला.
फॉक्सकॉनकडून बंगळुरूमध्ये नवीन प्लांट
फॉक्सकॉन बंगळुरूमध्ये नवीन प्लांट उभारत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा कंपनीचा दुसरा सर्वात मोठा आयफोन असेंबली प्लांट असेल. भारतात आयफोनचे उत्पादन वाढल्याने आणि नवीन प्लांट सुरू झाल्याने तरुणांना नोकऱ्यांच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीही याचा फायदा होईल, असाही अंदाज लावला जात आहे.