मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. भारतीय युनिट Hyundai Motor India चा IPO आजपासून सुरू होत आहे. 2022 मध्ये 21,000 कोटी रुपयांचा IPO लाँच करणारी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चा विक्रमही मोडला जाणार आहे. जर तुम्ही 13,720 रुपये गुंतवले तर तुम्हाला त्यातून चांगला परतावा मिळणार आहे.
Hyundai Motors च्या भारतीय युनिट Hyundai Motors India चा हा IPO आजपर्यंतचा देशातील सर्वात मोठा IPO ठरणार आहे. कारण हा 27,870.16 कोटी रुपयांचा असणार आहे, जो देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या IPO पेक्षा मोठा आहे. Hyundai च्या या IPO मध्ये तीन दिवस पैसे गुंतवण्याची संधी असेल आणि तो 17 ऑक्टोबरला बंद होईल.
Hyundai Motors India ने आधीच SEBI ला सादर केलेल्या ‘ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस’ (DRHP) मध्ये स्पष्ट केले की, Hyundai नवीन शेअर्स जारी करणार नाही. Hyundai Motors India 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 142,194,700 शेअर्स विक्रीसाठी ऑफर करणार आहे. याच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.