मुंबई : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार पाहिला मिळाला. त्यात अनेक शेअर्सची किंमत वाढली तर काहींची घटली. असे असताना आता एक अशी कंपनी आहे त्याच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाल्याचे आज पाहिला मिळाले. सुझलॉन एनर्जी लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे.
सुझलॉन कंपनीच्या शेअर्सने 5 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. तर वाढीसह कंपनीचा शेअर प्रथमच 60 रुपयांची पातळी ओलांडली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये या वाढीचे कारण जून तिमाहीचे निकाल आहेत. ट्रेडिंग सत्रात सुझलॉनच्या शेअर्समध्ये अनेक ब्लॉक डील झाले. ज्यामध्ये कंपनीच्या 0.3 टक्के इक्विटीने 227 कोटी रुपयांच्या शेअर्समध्ये बदल केला. 60 रुपयांच्या सरासरी किमतीने 3.8 कोटी शेअर्सची देवाणघेवाण झाली.
सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा निव्वळ नफा एप्रिल-जून या कालावधीत 200 टक्क्यांनी वाढून 300 कोटींहून अधिक झाला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या महसूलातही 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे वितरण सात वर्षांतील सर्वोच्च पातळीवर होते.