मुंबई : आज सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार,आज सोनं 110 रुपयांनी स्वस्त झाले आहे. भारतीय सराफा बाजारात आज सोने-चांदी स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज बुधवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,330 रुपये आहे.
सोनं झालं स्वस्त
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 18 कॅरेट सोन्याचा दर 47,490 रुपये प्रतितोळा आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 58,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 63,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, मंगळवारी सकाळी प्रतितोळा 24 कॅरेट सोन्याचा दर 63,440 रुपये होता, आज बुधवारी हा दर 63,330 रुपये आहे.
चांदीच्या दरातही घसरण
मंगळवारी एक किलो चांदीचा भाव 76,800 रुपये होता. मंगळवारी एक किलो चांदीचा भाव 76,800 रुपये होता. आज सोन्यासह चांदीचा भावही घसरला आहे. बुधवारी चांदी 300 रुपये किलोने स्वस्त झाली आहे. आज मुंबईमध्ये चांदीचा दर 76,300 रुपये प्रति किलो आहे.
प्रमुख शहरात सोन्याचे दर
- मुंबईत सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्याचा दर 63330 रुपये प्रति 10 ग्रॅमवर तर 22 कॅरेट सोन्याचा दर 58,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
- दिल्लीत सोनं 63,480 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 58,200 रुपये प्रतितोळा आहे.
- पुण्यात सोन्याचा आजचा दर 63330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- नाशकात 24 कॅरेट सोने 63370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- नागपूरात 24 कॅरेट सोने 63330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
- कोल्हापूरात 24 कॅरेट सोने 63330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.