नवी दिल्ली : तुमचंही एचडीएफसी बँकेत अकाउंट आहे? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना नव्या सिस्टिम अपग्रेडबद्दल माहिती दिली आहे. या काळात डाउनटाईममुळे काही सेवांवर परिणाम होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
एचडीएफसी बँकेच्या म्हणण्यानुसार, हे तांत्रिक अपग्रेड बँकेच्या सर्व्हरचा वेग वाढवण्यासाठी केले जाणार आहे. यामुळे ग्राहकांचा बँकिंग अनुभव सुधारेल. एचडीएफसी बँकेचा नियोजित डाउनटाईम पुढील शनिवारी 13 जुलै 2024 रोजी असणार आहे. अपग्रेड मध्यरात्री 3 वाजता सुरू होईल आणि त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता संपेल. ग्राहकांची गैरसोय कमी करण्यासाठी बँकेने दुसरा शनिवार बँक सुट्टी म्हणून निवडला आहे.
‘या’ सेवांवर होणार नाही परिणाम
- – रोख पैसे काढणे : तुम्ही तुमचे HDFC बँकेचे डेबिट कार्ड (प्रतिबंधित मर्यादेपर्यंत) किंवा क्रेडिट कार्ड वापरून कोणत्याही ATM मधून पैसे काढू शकता.
- – खरेदी करणे : डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि UPI तुम्ही तुमचे एचडीएफसी बँकेचे डेबिट कार्ड (प्रतिबंधित मर्यादेपर्यंत) किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप मशीनवर वापरू शकता.
- – तुम्ही तुमच्या HDFC बँकेचे डेबिट कार्ड (प्रतिबंधित मर्यादेपर्यंत) आणि PayZap सह क्रेडिट कार्डने ऑनलाईन खरेदी करू शकता.