राहुलकुमार अवचट:
यवत : पुणे सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे यवतसह परिसरात दु:खाचे वातावरण तयार झाले आहे.
भानुदास ऊर्फ तुषार नामदेव जाधव असे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, भानुदास जाधव हे दुचाकीवरून पुणे सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्याने चालले होते. तेव्हा त्यांना अचानक हृदयविकाराचा आल्याने ते जमिनीवर कोसळले. नागरिकांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेले परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घोषणा केली.
भानुदास जाधव यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झालेले असून तो एकुलता एक होता. यवत येथील युवा उद्योजक कुमार जाधव यांचा तो सख्खा चुलत भाऊ होता.
दरम्यान, भानुदास जाधव हे शरीराने धष्टपुष्ट असून ते काही वर्षांपूर्वी पोलीस भरती झाले होते. मात्र काही कारणास्तव त्याने प्रशिक्षण दरम्यान नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. आता तो घरीच व्यावसाय करत होता. कसलाही आजार नसताना अचानक हृदयविकाराचा धक्का होऊन थेट मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.