अजित जगताप
Vaduj News : वडूज : सध्या महाराष्ट्रात प्रेम जाळ्यात फसून मुली घरदार सोडत आहेत. त्यामुळे कुटुंब उध्वस्त होत असून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जात आहे. परंतु खटाव तालुक्यातील तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप घरी पाठवण्यात वडूज पोलिसांना यश मिळाले आहे. (With the promptness of the Vaduj police, the three minor girls returned to their homes)
दोन आरोपी अटकेत
याबाबत माहिती अशी की, खटाव तालुक्यातील अंबवडे या गावातील एका साडेचौदा वर्षाच्या मुलीला आरोपी योगेश सगण बूधे याने फूस लावून थेट मुंबई मार्गे उत्तर प्रदेशात पळवून नेले. तशीच दुसरी पिंपळवाडी या ठिकाणी घटना घडल्या असून (Vaduj News) सदरच्या मुलीला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी विजय पांडुंरंग राजगे याला पुणे येथून अटक करण्यात आली.
तिसरी घटना मायणी येथे घडली होती. इतर दोन गुन्ह्यात वडूज पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले पोलीस कोठडी सुनावली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्याखाली पोलिसांनी त्यांच्या विरोधात भा. द. क.३६३,३६६,३७६, पोक्सो व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदानुसार कलमे लावली असून सदरचे प्रकार हा समाज मनाचा आरसा ठरू लागला आहे. (Vaduj News) सध्या सोशल मीडिया तसेच मोबाईलद्वारे होणारे संभाषण याचा अतिरिक्त मारा, अतिरिक्त वापर या गोष्टींमुळे अल्पवयीन मुली आपले घरदार सोडून पळून जात आहे. ही गंभीर बाब असून समाज मनाने याचा विचार करणे गरजेचे आहे.
पूर्वीच्या काळी आपल्या घराची इज्जत म्हणून अनेक जण आपल्या मुलीचे वयात आल्यानंतर लग्न करत होते. आता तीस ते पस्तीस वर्षे झाले तरी नोकरी व शिक्षणामुळे मुलींची लग्न केली जात नाहीत. यातील काही मुली या आपलं उद्दिष्ट पूर्ण करून उच्चपदस्थ अधिकारी बनतात व चांगल्या पद्धतीने विवाह करून चांगला संसार करतात. पण, काही अल्पवयीन मुली गैरसमज व स्वप्न दुनियेत रंगीत होऊन आपला आयुष्य बेरंग करत आहे. (Vaduj News) याबाबत आता विचार करणे गरजेचे आहे. दरम्यान, उप विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज पोलीस ठाण्यातील स पो नि दत्तात्रय दराडे व पोलीस नाईक शिवाजी खाडे, भूषण माने, गणेश शिरकुरे, सत्यवान खाडे, लवळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. अधिक तपास स्वतः सपोनि दराडे करीत आहेत.
एका अल्पवयीन मुलीला दहावीच्या परीक्षेला ७१ टक्के गुण आजच मिळाले असून तिला पुढे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्या अशी तिने पालकांकडे मागणी केली आहे.