रीवा : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीला शेतातच लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ रीवा जिल्ह्यातील मौगंजचा असल्याचे सांगण्यात येत असून हा व्हिडिओ १० ते १५ दिवसांचा असल्याचेही सांगण्यात येत आहे.
मध्य प्रदेश (Madhya Pradesh) के रीवा (Rewa) जिले से दिल-दहला देने वाला वीडियो सामने आया है. #Rewa #MadhyaPradesh @ReporterRavish https://t.co/IfwMLOU373
— AajTak (@aajtak) December 24, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद होते. या वादाचे रुपांतर भांडणात होते. व प्रियकर रागाने प्रेयसीला जमिनीवर फेकतो. आणि तिच्या चेहऱ्यावर अनेक वार केले. यानंतर मुलगी बेशुद्ध पडते. चूक लक्षात आल्यानंतर तरुणाने त्याला उठवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, मुलीचा मित्र आणि इतर लोक तेथे पोहोचतात. सर्वजण मुलीला शुद्धीवर आणण्याच्या प्रयत्नात करतात. मात्र सद्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मौगंज पोलिसांच्याही निदर्शनास आला आहे.
या व्हिडिओचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.