संतोष गायकवाड
Wagholi News : वाघोली : पुणे शहर व उपनगरातील पान टपरीत अंमली पदार्थ विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या पान टपरीवर पुणे पोलिसांकडून छापे टाकून कारवाई केली जात असून पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर धाड टाकल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
तरुणांनी अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला…
दरम्यान, अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या पान टपरी चालकांची नागरिकांनी आयुक्तांच्या व्हॉटसअॅप नंबरवर तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Wagholi News)
अनेक तरुणांना अंमली पदार्थांची ओळख करुन देण्याच्या टच पॉईंट्सपैकी एक म्हणजे पान-बिडी टपरी होय, असे या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे. तसेच आपल्या परिसरात अशा प्रकारे अंमली पदार्थाची अवैधपणे विक्री होत असेल तर याची तक्रार करण्यासाठी पोलिसांनी नंबर प्रसिद्ध केला आहे. (Wagholi News)
पुणे शहरात पान शॉपमध्ये अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. तरुणांनी अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी २२ डिसेंबरपासून आजपर्यंत ८.३५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. तर ११८ जणांवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Wagholi News)
तक्रार कोठे करावी
नागरिक राहात असलेल्या परिसरात एखाद्या पान शॉपवर अवैधरित्या अंमली पदार्थाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर CP WhatsApp 8975953100 अथवा ट्विटरवर तक्रार दाखल करावी, तक्रार दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाईल.