Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे जिल्ह्यातील मंजूर कामांना अखेर मुहूर्त; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 July 2023, 13:41

Pune News  : पुणे : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत शिरुर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांच्या ९१.५१ कोटींच्या निविदांना ग्रामविकास विभागाने आज मंजुरी दिली. या अंतर्गत जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर-हवेली तालुक्यातील कामांना सुरूवात करण्याचे आदेश देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता या रस्त्यांच्या कामांना लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामांना मुहूर्त मिळाला आहे.

नागरिकांनी व्यक्त केले समाधान

ग्रामीण विकास मंत्रालयाची मंजुरी
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कामांचा प्रस्ताव केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या पंतप्रधान ग्राम सडक योजना व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास विभागाने सर्वच रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानंतर या निविदा मंजुरीसाठी ग्रामविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आल्या होत्या. (Pune News)  या निविदांना मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेरीस आज या निविदांना मंजुरी देण्यात आली असून कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यास सुरुवात झाली आहे.

शिरूर-हवेली मतदारसंघासाठी ३६.४९ कोटींचा निधी
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात एकूण ६ रस्त्यांची कामे मंजूर झाली असून त्यानुसार शिरूर तालुक्यातील प्रजिमा ९ अहमदाबाद ते दुडेवाडी ते निमगाव दुडे ते प्रजिमा ५१. ६.४ किलोमीटर रक्कम रुपये ४.७८ कोटी, प्रजिमा ५३ कोळगाव डोळस ते प्रजिमा १०० मांडवगण फराटा ते पिंपळसुटी. ९.५७ किलोमीटर रक्कम रुपये १२.४९ कोटी आणि रा‌ज्यमार्ग ११८ न्हावरा ते निर्वी धुमाळवस्ती ते कोळपेवस्ती. ५.१० किलोमीटर रक्कम रुपये ६.२२ कोटी आणि हवेली तालुक्यातील प्रजिमा २९ डोंगरगाव ते वाडेबोल्हाई गोतेमळा भिवरी ते कोरेगाव मूळ रस्ता. ४.०६ किलोमीटर रक्कम २.२६ कोटी, रा.मा. ९ सोरतापवाडी तरडे खालचे ते तरडे वरचे तरडे रस्ता. ५.०४ किलोमीटर रक्कम ४.६३ कोटी आणि राज्यमार्ग ११६ केसनंद ते वाडेगाव गोतेमळा आष्टापूर हिंगणगाव रस्ता, ७.१३ किलोमीटर रक्कम ६.११ कोटी या एकूण ३६.४९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

जुन्नरमध्ये चार रस्त्यांसाठी २६.२७ कोटींचा निधी
पंतप्रधान ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत जुन्नर तालुक्यातील ओतूर पानसरेवाडी डुंबरवाडी रस्ता ६.२ किलोमीटर रक्कम रुपये ३.९१ कोटी, बोरी बुद्रुक ते राजुरी उंच खडकवाडी रस्ता ७ किलोमीटर रक्कम रुपये ४.८२ कोटी, आळे भटकळवाडी वडगाव कांदळी ते हिवरे तर्फे नारायणगाव रस्ता. ८.०४ किलोमीटर रक्कम रुपये५.६६ कोटी आणि खोडद ते एसएच-११२ रस्ता ४.०५ किलोमीटर रक्कम रुपये ३.१५ कोटी अशा एकूण ४ रस्त्यांसाठी २६.२७ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

आंबेगाव तालुक्यासाठी २०.६२ कोटींचा निधी
आंबेगाव तालुक्यातील पारगाव काटापुर बुद्रुक लाखणगाव रस्ता ७.०८ किलोमीटर रक्कम रुपये ८.३७ कोटी, प्रजिमा १४ वैदवाडी ते इजिमा ३० रस्ता ५.०४ किलोमीटर रक्कम रुपये ५.८० कोटी आणि प्रजिमा ५ कानसे गंगापूर बुद्रुक खुर्द ठाकरवाडी पारुंडे रस्ता. ८.०१ किलोमीटर रक्कम रुपये ६.४५ कोटी अशा तीन रस्त्यांसाठी रुपये २०.६२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

खेड तालुक्यासाठी १४.७६ कोटींचा निधी
खेड तालुक्यातील काळुस ते संगमवाडी. ४.५५ किलोमीटर रुपये ३.२९ कोटी, प्रजिमा १९ खरपुडी बुद्रुक ते रेटवडी वाकळवाडी वरूडे. ४.०४ किलोमीटर रक्कम रुपये ३.५४ कोटी आणि प्रजिमा १६ हेद्रुज बच्चेवाडी कडलगवाडी वाशेरे कोहींडे बुद्रुक रस्ता. ९.१५ किलोमीटर रक्कम रुपये ७.९३ कोटी अशा ३ रस्त्यांसाठी १४.७६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत कामांच्या मंजुरीसाठी मुळातच बराच काळ लागला होता. त्यामुळे मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकर कामे सुरू होतील अशी अपेक्षा होती. परंतु ग्रामविकास विभागाकडून या निविदांना मंजुरी मिळण्यास दिरंगाई होत होती. (Pune News ) त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेरीस ही मंजुरी मिळून कार्यारंभ आदेश देण्यास सुरुवात झाल्याने आता लवकर ही कामे सुरू होतील. सर्वच तालुक्यातील रस्ते अतिशय महत्त्वाचे असल्याने ते चांगल्या दर्जाचे व्हावेत यासाठी आपण बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : इंदापूर तालुक्यातील शेतीला खडकवासल्याचे आजपासून आवर्तन – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

Pune News : पुणे शहरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची विश्रांतवाडी पोलिसांनी काढली धिंड..

Pune News : पुणेकरांची डोकेदुखी वाढली! ऑनलाइन भाडेकरार करा अन् पोलीस ठाण्यात हेलपाटेही मारा…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Kolhapur News : पै पै साठवून घरकूल उभारलं अन् राहत्या घरानंच सगळं हिरावलं... धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.