लोणी काळभोर, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मिडियावर कोयत्याचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट क्र ६ च्या पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
महेश उर्फ मॅडी बाळासाहेब मोहन (वय-२० रा. लेन नं ९, बोराटे वस्ती, चंदननगर), व ऋषिकेश सुभाष जगधने (वय-२० रा. वाघेश्वरनगर, वाघोली, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट ६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुणे शहर आयुक्तालयाचे हद्दीत गस्त घालीत होते. यावेळी पथकातील पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, गुन्हे अभिलेखावरील इसम महेश उर्फ मॅडी बाळासाहेब मोहन व वाघोली परिसरात ऋषिकेश जगधने यांचेजवळ कोयते आहेत अशी माहिती मिळाली होती.
मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार यूनिट ६ कडील पथकाने वेगवेगळी दोन पथके बनवून सापळा रचून दोघांनाहि ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ हजार रुपये किमतीचे ०२ लोखंडी पात्याचे कोयते मिळून आले आहेत. तसेच अनुक्रमे चंदननगर व लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय हत्यारबंदी कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर गुन्हे २ या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल व त्यांचे पथकाने केली आहे.