प्रमोल कुसेकर
Shirur Sad News : मांडवगण फराटा (पुणे) : रात्रीच्या वेळी रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन एका २८ वर्षीय तरुणाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. ०९) शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथे संध्याकाळी हि घटना घडली आहे. Shirur Sad News
विश्वनाथ चौरंग चव्हाण (वय – २८) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ हा शेती व्यवसायाबरोबरच हमालीचे काम करून उदरनिर्वाह करत होता. रविवारी रात्री कांद्याची गाडी भरण्यासाठी तो सायंकाळच्या सुमारास गेला होता. रात्री काम उरकून तो आपल्या दुचाकीवरून मित्राला त्याच्या घरी सोडवण्यासाठी गेला होता. मित्राला सोडवून परत येत असताना रस्त्यावर विद्युत तार तुटून पडली होती. Shirur Sad News
या तुटलेल्या विद्युत तारेत त्याची दुचाकी अडकली. विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का लागुन त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी या रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांच्या ही गोष्ट निदर्शनास येताच कुटुंबीयांना माहिती कळाली. या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणचे न्हावरे शाखा अभियंता बाळासाहेब टेंगले व वडगाव रासाईचे शाखा अभियंता सुयश मुंगसे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. Shirur Sad News
दरम्यान, या घटनेबाबत घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक नरेंद्र माने यांनी महावितरणची तार तुटल्यानेच युवकाचा प्राण गेला असून त्यास शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा बळी..
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी विद्युत तारा या जीर्ण झाल्या असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे असे अपघात होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटण्याचे प्रमाण अधिक आहे. महावितरण विभागाचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहेत. जीर्ण झालेल्या विद्युत तारा महावितरण विभागाने त्वरित बदलून टाकाव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रात्री अपरात्री शेतकरी वर्गाला शेती कामासाठी शेतात जावे लागते. त्यामुळे महावितरणने ही बाब गांभीर्याने घ्यावी.