अक्षय भोरडे
Shirur News : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील महिलेचा कंपनीतील सहकर्मचाऱ्यानेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सणसवाडी (ता. शिरूर) येथे नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामू काशीराम कुसळकर (रा. काळुबाई मंदिरा शेजारी, सणसवाडी, ता. शिरूर जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.(Shirur News)
शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल.
याप्रकरणी पीडित महिलेनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील महिलेची कंपनीमध्ये काम करताना ओळख झाल्यानंतर रामु कुसळकर याने पीडित महिलेचे फोटो काढून घेतले. त्यानंतर महिलेला वारंवार भेटून महिलेचा पाठलाग करत आरोपी रामु हा तिच्याकडे लग्नाची मागणी करू लागला.(Shirur News)
दरम्यान, महिलेने आरोपीच्या मागणीच्या तगाद्याला प्रतिसाद दिला नसल्याने आरोपी रामू महिलेचा पाठलाग करून ‘तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुझे काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी समाजात बदनामी करेन’ अशी धमकी दिली. तसेच महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत महिलेचा विनयभंग केला.(Shirur News)
याप्रकरणी पीडित महिलेनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी रामू कुसळकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग करीत आहे.