नाशिक : नाशिक जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरुच असून शहरातील अंबड लिंक रोड परिसरात दरोडा पडल्याची घटना घडली असून यात एका ६५ वर्षीय वृद्धाचा खून झाला असून दरोडेखोरांनी पोबारा केला आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंबड लिंकरोड परिसरात कार्डिलें कुटुंबीय राहत असून काल (ता. २५) सायंकाळी कर्डीले यांच्या घरातील सदस्य बाहेर गेले होते. त्यावेळी ६५ वर्षीय जगन्नाथ कर्डीले हे एकटेच घरात असताना दरोडेखोरांनी अचानक घरात प्रवेश केला.
कर्डीले यांना घरात कुणीतरी घुसले असल्याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता तोंड बांधलेले दरोडेखोर समोरच होते. त्यांना पाहून कर्डीले यांनी आरडाओरड सुरु केली असता दरोडेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने कर्डीले यांच्या डोक्यावर वार केला. यामुळे कर्डीले यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दरोडेखोरांनी घरातील सुमारे सहा ते सात लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला.
या घटनेने पूर्ण नाशिक शहर हादरून घेणे असून अशा तब्बल ४ घटना मागील ४० दिवसात घडल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. वाढत्या घरफोड्यांमुळे देखील नागरिक हैराण झाले असताना दरोडेखोर देखील सक्रिय झाल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यापूर्वी सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे सशस्त्र दरोड्याची दुसरी घटना घडली. यामुळे सध्या पोलीस प्रशासन देखिल ‘ ऍक्टिव्ह’ झाले असून गुन्ह्याचा कसून तपास सुरु असल्याचे पोलीसानाकडून सांगण्यात आले आहे.