वाघोली : १५ जुलै २०२४ रोजी इको गाडीसह येवुन वाघोली येथील गणेश ज्वेलर्सचे शटर उचकटुन घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील हंसराज उर्फ हंसु रनजितसिंग टाक, (वय २० वर्षे, रा. तुळजाभवानी वसाहत, बंटर शाळेच्या पाठीमागे, कॅनॉलशेजारी, हडपसर, गाडीतळ, पुणे), सनिर्सिंग जितेंद्रसिंग जुनी (वय २२ वर्षे, रा.सर्वे नं.११०, कोठारी व्हील्स शेजारी रामटेकडी, हडपसर, पुणे) या आरोपींना त्यांनी चोरी केलेल्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखा, युनिट ६ ने सदरची कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ जुलै २०२४ रोजी गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पोलीस हवालदार रमेश मेमाणे, पोलीस नामदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, शेखर काटे हे युनिट ६ च्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दि. १५ जुलै रोजी वाघोली येथे घरफोडीचा गुन्हा घडला होता.
सदर गुन्हयातील निष्पन्न आरोपी गुन्हे अभिलेखावरील आरोपी नामे हंसराज टाक व सनीसिंग जुनी हे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाघोली ते भावडी रोडवर भैरवनाथ मंदिराजवळ मोकळया मैदानात वाघोली येथे चोरीचे वाहनांसह थांबलेले आहेत. ही खात्रीशीर बातमी मिळाल्याने खातरजमा करून ते पळून जाण्याच्या तयारीत असताना मोठ्या शिताफीने संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वाघोली येथील गणेश ज्वेलर्स फोडले असल्याची कबुली दिली.
नमुद आरोपींकडुन उघडकीस आलेले गुन्हे १) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.न. ६८४/२०२४ मा.न्या.सं. कलम ३३१ (४),३०५, २) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.न. ६५५/२०२४, मा. न्या. सं. कलम ३३१ (४).३०५ (अ) ,३ ) लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.न. ६९३/२०२४. भा. न्या. सं. कलम ३०३ (२) ,४ ) येरवडा पोलीस स्टेशन गु.र.न. ४३८/२०२४, भा. न्या. सं. कलम ३०३ (२)
तसेच देहुरोड पोलीस स्टेशन (पिंपरी चिंचवड) गु.र.नं. ३४५/२०२४.मा.न्या. सं. कलम ३०३ (२) ५ वर नमुद आरोपीकडुन दोन दुचाकी घरफोडी व एटीएम फोडीसाठी लागणारे साहित्य व हत्यारे असा एकुण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार, पोलीस सह-आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २. सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, समीर पिलाने, बाळासाहेब तनपुरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.