शेरखान शेख
Ranjangaon News : रांजणगाव गणपती : पुणे-नगर महामार्गावरील खंडाळा माथा येथील आर. के. हॉटेल परमिट रूम येथून घेतलेल्या बियरचे पैसे देत नाही, असे सांगून शेजारील दगड हॉटेलवर फेकून हॉटेलचे नुकसान केले. हॉटेल सुरु ठेवायचे असेल तर महिन्याला पाच हजार रुपये द्यायचे, असे म्हणून खंडणी मागितल्याची घटना रांजणगाव एमआयडीसी परिसरात नुकतीच घडली. याप्रकरणी प्रदीप ऊर्फ पांडा ज्ञानोबा दरवडे याच्याविरुद्ध खंडणीसह शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल
खंडाळा माथा (ता. शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या आर. के. हॉटेल परमिट रूम येथे प्रदीप दरवडे आला असता, त्याने मद्याची बाटली विकत घेतली. (Ranjangaon News) याचे पैसे मी देणार नाही, असे म्हणून हॉटेलचालक महिलेशी हुज्जत घालू लागला. या वेळी हॉटेल कामगारांनी त्याला हॉटेलच्या बाहेर काढले असता, त्याने बाहेरील दगड उचलून हॉटेलवर फेकून हॉटेलमधील साहित्याचे नुकसान केले.
या वेळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेमध्ये एक कामगार देखील जखमी झाला. या वेळी प्रदीप याने तुम्हाला हॉटेल सुरु ठेवायचे असेल तर महिन्याला पाच हजार रुपये द्यायचे, असे म्हणून खंडणी मागितली. (Ranjangaon News) त्यांनतर देखील प्रदीप याने हॉटेल कामगारांना फोन करुन तुम्ही सगळे कामगार हॉटेल सोडून जा, नाहीतर तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी दिली.
याबाबत कमल उत्तम नरवडे (वय ६० वर्षे, रा. खंडाळा माथा, खंडाळे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.(Ranjangaon News) त्यानंतर पोलिसांनी प्रदीप उर्फ पांडा दरवडे (रा. खंडाळे, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध शिवीगाळ तसेच खंडणी आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वैभव मोरे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ranjangaon News : “पी एम स्किल रन”ला टाकळी हाजी मध्ये उस्फूर्त प्रतिसाद.