Pune पुणे: अल्पवयीन मुलीला कल्याण रेल्वे स्थानकापासून गुंगींचे औषध देऊन पळून नेऊन लैंगिक अत्याचार आणि एका तिऱ्हाईत व्यक्तीस 40 हजार रुपयांना विकल्याचा आरोप असलेला आरोपी औरंगजेब उर्फ सलीम मकबूल शेख याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी मंगळवारी (ता.११) निर्दोष मुक्त करण्याचे निर्णय दिला.
पीडिता व फिर्यादी यांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध साक्ष दिली होती. 21 फेब्रुवारी 2017 रोजी पीडितेच्या आईने पीडितेस पिंपरी रेल्वे स्थानक येथून सिंहगड एक्सप्रेसमध्ये बसवून ठाणे येथे पाठविले होते. त्या दिवशी कल्याण रेल्वे स्थानक येथे पीडिता पाणी पिण्यासाठी उतरली असता आरोपीने तिला गुंगींचे औषध असलेले पाणी देऊन लखनऊ उत्तर प्रदेश येथे पळवून नेले. तब्बल 51 दिवस पीडिता उत्तरप्रदेशात होती.
2017 पासून आरोपी येरवडा कारागृहात बंदिस्त..!
त्यादरम्यान आरोपीने तिला एका व्यक्तीस 40 हजार रुपयांना विकल्याचे आरोप करण्यात आला होता. पीडितेच्या आईने मुलीचे अपहरण झाल्याबाबत रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी व पीडिता यांना उत्तरप्रदेश येथून पकडून आणले होते. त्यानंतर 2017 पासून आरोपी येरवडा कारागृहात बंदिस्त होता.
आरोपीने कारागृहातून पुणे जिल्हा विधी प्राधिकरनाकडे बचावाकामी वकील मिळण्यासाठी अर्ज केला होता त्यानुसार प्राधिकारणाने वकील प्रितेश खराडे यांची नेमणूक आरोपीच्या बचावासाठी केली. आरोपीतर्फे खराडे यांनी साक्षीदारांची उलट तपासणी घेतली. त्यादरम्यान लोक अभिरक्षक कार्यालय (लीगल एड डिफेन्स कौन्सिल सिस्टीम ) चालू करण्यात आले व त्यामार्फत मुख्य लोक
अभिरक्षक (चीफ लीगल एड डिफेन्स कौन्सिल ) म्हणून खराडे यांची नेमणूक करण्यात आल्याने हे प्रकरण लोक अभिरक्षक कार्यालयाकडे वर्ग झाले होते.
आरोपीतर्फे पीडिता अल्पवयिन असल्याबाबतचा कागदोपत्री विश्वसार्ह पुरावा नाही तसेच पीडितेच्या 2 जवाबामध्ये मोठी तफावत असल्याने तिची साक्ष ग्राह्य धरता येणार नसल्याचा युक्तीवाद लोक अभिरक्षक कार्यालयामार्फत खराडे व मयूर दोडके यांनी केला.
न्यायालयाने आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद लक्षात घेऊन आरोपीची निर्दोष मुक्तता केली.