Pune Sad News पुणे : चिमण्यांना दाणे टाकण्यासाठी तो इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेला. चिमण्या पाहत असताना शेवाळलेल्या फरशीवरून पाय घसरून तोल गेला आणि तो चौथ्या मजल्यावरून थेट खाली पडला. (Pune Sad News) या अपघातात त्याचा जागीत मृत्यू झाला. (Pune Sad News) ही धक्कादायक घटना पुण्यातील मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील एका सोसायटीत घडली. (Pune Sad News) या अपघातात एका १३ वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले. (Pune Sad News)
वडगाव मावळ येथील संभाजीनगर भागातील दु:खद घटना..
अभिनव जगदीश कडधाने (वय १३) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो वडगाव मावळ येथील संभाजीनगर भागातील कृष्णा पार्क सोसायटीमध्ये राहात होता. मुलाच्या अचानक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अभिनव बुधवारी सकाळच्या सुमारास चिमण्यांना धआन्य टाकण्याच्या निमित्ताने गच्चीवर गेला होता. पाऊस झाल्याने गच्चीवरील फरशांवर शेवाळ साचून काही भाग निसरडा झाला होता. अभिनव चिमण्यांना दाणे घालत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून थेट खाली पडला.
दरम्यान, अभिनव खाली पडल्याचे कुटुंबियांना कळताच तत्काळ त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले; पण त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. अभिनव हा घरात सर्वांचा लाडका होता. वडगाव मावळ परिसरातील रमेशकुमार सहानी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये अभिनव शिक्षण घेत होता. शाळेमध्ये तो मित्रांचा लाडका होता. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबावर आणि त्याच्या मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या अचानक जाण्याने परिसरातील नागरिकांनी देखील हळहळ व्यक्त केली.