Pune News : पुणे : ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीत विवाहित असलेली अल्पवयीन मुलगी गर्भवती निघाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आई वडिलांसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिस शिपाई वैशाली सोपान पुंडे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायदा, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील १५ वर्षीय मुलीच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह आई-वडिलांनी एका तरुणाशी लावून दिला.(Pune News) मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती पतीसह सासू-सासऱ्यांना होती. विवाहानंतर मुलगी गर्भवती राहिली.
दरम्यान, मुलगी गर्भवती झाल्यानंतर ती बाळंतपणासाठी माहेरी आली. आई-वडिलांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले. वैद्यकीय तज्ज्ञांनी तिची तपासणी केली. (Pune News) तेव्हा मुलगी अल्पवयीन असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.
त्यानंतर ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ससून रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय अहवालानुसार अल्पवयीन मुलीचे आई-वडील, पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रेरणा कुलकर्णी करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात रंगला भोंडला महोत्सव