Pune News : पती-पत्नीतील कौटुंबिक वादावरून एनडीएतील अधिकाऱ्याला पत्नीसह सासू-सासऱ्याकडून मारहाण पती-पत्नीतील कौटुंबिक वादावरून एनडीएतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला त्याची पत्नी, सासू-सासऱ्याकडून डांबून ठेवत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात पत्नी, सासू, सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Pune News
सासू-सासऱ्याकडून डांबून ठेवत मारहाण केल्याची घटना घडली आहे.
मेजर परिक्षित बिष्णोई (३४, प्रशिक्षक, एनडीए) असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तर पत्नी शिविका चौधरी, सासू गायत्री सुभाष आणि सासरे सुभाष चंद्राPune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेजर परिक्षित बिष्णोई (३४, प्रशिक्षक, एनडीए) यांना घरगुती वादातून त्यांची पत्नी शिविका चौधरी, सासू गायत्री सुभाष चंद्रा आणि सासरे सुभाष चंद्रा या तिघांनी मिळून घरात डांबून ठेवले. Pune News तसेच बिष्णोई यांना कामावर जाण्यास मज्जाव करत, शिवीगाळ करत मारहाण केली.
या दरम्यान तुझी नोकरी घालवू, कोर्ट मार्शल करू, अशी धमकी देखील दिली. हा प्रकार १७ डिसेंबर २०२२ रोजी घडला. याप्रकरणी मेजर बिष्णोई यांनी तक्रार केली होती, त्यानंतर १५ जून रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उत्तमनगर पोलिस करीत आहेत.Pune News