Pune News : पुणे : शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत असल्याच्या अनेक घटना उघडकीला येत आहेत. माजी नगरसेविकेवर तिच्या मित्रानेच अत्याचार केला आहे. मैत्री संबंधातून काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन, बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीला आली आहे. या प्रकरणी नगरसेविकेने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने वेळोवेळी धमकी देत पैसेही घेतल्याचा आरोप माजी नगरसेविकेने तक्रारीत केला आहे. पर्वती पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
मित्रानेच केला बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका नगरसेविकेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माजी नगरसेविका असलेल्या या महिलेची सचिन काकडे याच्याशी मैत्री होती. (Pune News ) त्या मैत्री संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी काकडे याने देऊन, माजी नगरसेविकेवर अत्याचार केला. २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. अखेर नगरसेविकेने पर्वती पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून काकडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आरोपी सचिन काकडे आणि पीडित नगरसेविका हे अनेक वर्षांपासून मित्र आहेत. दोघांच्या मैत्रीसंबंधाबाबतची माहिती तुझ्या पतीला देईन, अशी धमकी काकडे वारंवार देत त्यासाठी काकडे याने दहा लाख रुपयांची मागणी केली. (Pune News ) त्यानंतर वेळोवेळी काकडे पैशांची मागणी करत होता. पैसे न दिल्यास फोटो आणि ध्वनिफित समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी तो देत होता.
दोन दिवसांपूर्वी काकडे नगरसेविकेच्या घरी आला. तू दुसरा विवाह केला आहे. तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आहे, असे सांगून त्याने तिला मारहाण केली. (Pune News ) अखेर काकडेच्या त्रासाला कंटाळून तिने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सिंहगड रस्त्यावरील दुचाकी विक्री दालनाला भीषण आग
Pune News : टोळीयुद्धातून तरुणाचा मृत्यू; आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा साथीदार गजाआड