Pune News : पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरुन कस्टम विभागाने कारवाई करून कोणार्क एक्सप्रेसमधून सुमारे २७ लाख रुपये किंमतीचा तब्बल ९० किलो गांजा जप्त केला आहे. तसेच या कारवाईत दोन तस्करांना अटक केली आहे.
कोणार्क एक्सप्रेसमधून जप्त केला गांजा
मिळालेल्या माहितीनुसार, ओडीसावरून पुण्याकडे येणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी होणार अशी माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. (Pune News ) मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचला. कोणार्क एक्सप्रेस पुण्यात दाखल होताच कस्टम विभागाने धडाधड कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत ९० किलो गांजा जप्त केला आहे. तर दोन तस्करांना अटक केली आहे.
दरम्यान, सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि जांगाची तस्करी होत असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे. (Pune News ) त्यात आतापर्यंत लाखो रुपयांचा गांजा पुणे शहरात जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलीस,रेल्वे पोलीस आणि कस्टम या विभागांची यांची तस्करांवर करडी नजर असल्याचं कारवायांमधून दिसून येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; आता वंदे भारत एक्स्प्रेस पुण्यातून सुटणार…
Pune News : पुण्यातील बाबा भिडे पूल तब्बल दोन महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद; काय आहे कारण…
Pune News : नवले पुलावर अपघातांचे सत्र सुरूच; सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उलटला