Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात कोयता, कुऱ्हाड, लोखंडी राॅड सदृश्य हत्यारांच्या साह्याने मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मित्राच्या घरात मद्य पीत बसलेले असताना, दोघांमध्ये टोकाचे वाद झाले. या वादातून आपल्याच मित्राच्या डोक्यात कुर्हाडीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार वानवडीतील फातिमानगरमध्ये मंगळवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी एकावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वानवडीतील प्रकार; गुन्हा दाखल
याबाबत पेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद मुजावर (वय ५०, रा. मुक्तानंद सोसायटी, रो हाऊस, फातिमा नगर, वानवडी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.(Pune News ) याबाबत मुजावर यांच्या पत्नी नाजमीन जावेद मुजावर (वय ४८) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी रियाज शेख (वय ५०, रा. मंडई) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
वानवडी येथील मुक्तानंद सोसायटीमध्ये फिर्यादी यांचे रो हाऊस आहे. त्यांचे पती जावेद व मित्र रियाज शेख या दोघांमध्ये पैशांवरून वाद सुरू होते. त्याच दरम्यान दोघे बागेतील खोलीमध्ये मद्य पित बसले होते. त्याचवेळी दोघांमधील वाद विकोपाला गेले. (Pune News ) रियाज शेख याने बागेतील झाडे कापण्यासाठी वापरत असलेल्या लोखंडी कुऱ्हाडीने जावेद यांच्या डोक्यावर, कानावर व हाताच्या कोपरावर वार केले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.
आवाज ऐकून जावेद यांची पत्नी तेथे गेली असता, पोलिसांत तक्रार केली तर बघुन घेण्याची धमकी देऊन रियाज शेख पळून गेला. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरमकर करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीच्या मालकीवरून पती-पत्नीमध्येच रंगला वाद