Pune News : पुणे : बाणेर रस्ता परिसरात चारचाकीचा धक्का लागून दुचाकीवरील तरुण व तरुणी खाली पडले. या प्रकारामुळे खजील झालेल्या चारचाकीचालकाने खाली उतरून तरुण-तरुणीची विचारपूस केली. ‘तुम्हाला काही लागले आहे का?, काही मदत लागणार आहे का?’ अशी विचारणा करून, मदतीची तयारीही दर्शवली. बोलणे सुरू असताना अचानक तरुण-तरुणी चारचाकीमध्ये बसले आणि चारचाकीच पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला आहे.
चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) याप्रकरणी तुषार सुनील कोळेकर ( वय २१, रा. लोणी काळभोर, पुणे ) याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार कोळेकर हे त्यांच्या मोटारीमधून बाणेर रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांच्या चारचाकीचा दुचाकीला धक्का लागला. (Pune News) त्यामुळे दूचाकीवरील तरुण आणि तरुणी रस्त्यावर पडले. त्यांना काही लागले आहे का? मदतीची गरज आहे का? अशी विचारपूस करण्यासाठी कोळेकर यांनी मोटार थांबवून त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपीने तक्रारदारांची कॉलर पकडून त्याच्या अजून दोन साथीदारांना बोलावून घेतले. तक्रारदारांच्या मोटारीची किल्ली घेऊन त्यांनी मोटार जबरदस्तीने चोरी करून पळवून नेली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : स्वारगेट परिसरात रिक्षा चालकांकडून तरुणाचा खून ; चारही रिक्षा चालकांना अटक..
Pune News : नीरा ते लोणंद रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण; आता रेल्वे धावणार सुसाट
Pune News : रिक्षा, कॅबचालकांनी बंद पुकारताच, आरटीओ अॅक्शन मोडवर