Pune News : पुणे : ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास पार्ट टाईम नोकरी मिळेल, असे आमिष दाखवून, वेळोवेळी विविध बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगून, बिबवेवाडी येथील ४६ वर्षांच्या व्यक्तीची तब्बल ९ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
याबाबत विनय नारायण घाणेकर (वय-४६, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी ८८१२०XXXXX मोबाईल धारक, टेलिग्राम युजर तसेच विविध बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १९ ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान बिबवेवाडी येथे घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी फिर्यादीशी ८८१२०XXXXX नंबरवरून संपर्क साधला. त्यांना पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. (Pune News ) फिर्यादी यांना टेलिग्रामवरुन वेगवेगळ्या लिंक पाठवून टास्क दिले. टास्क पूर्ण केल्यास पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवले. विविध बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. नोकरीच्या आशेने फिर्यादी यांनी ९ लाख २ हजार ६०० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात जमा केले. त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.
फिर्य़ादी यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. (Pune News ) सायबर पोलिसांनी हा गुन्हा मार्केट यार्ड पोलिसांकडे वर्ग केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune news : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर जल्लोष; तरुणांवर पोलिसांकडून लाठीमार; कारवाईची मागणी