Pune News : पुणे : हडपसर परिसरातील गोसावी वस्ती, वैद्यवाडी येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करुन, हत्याराचा धाक दाखवून, जीवे मारण्याची धमकी दिली. टोळक्याने धारदार शस्त्रे घेऊन २२ वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
पूर्ववैमनस्यातून केली वाहनांची तोडफ़ोड
याबाबत रोहीत भारत गायकवाड (वय-२४, रा. गोसावी वस्ती, हनुमान मंदीराजवळ, वैद्यवाडी, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News ) त्यानुसार यश जावळे, युवराज बदे, सुरज पंडीत, समीर शेख, अक्षय राऊत यांच्यासह तीन ते चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. तर यश जावळे, सुरज पंडीत, अक्षय राऊत यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ व मारहाण केली. (Pune News ) धारदार हत्याराचा धाक दाखवून, जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, अंगठी व रोख रक्कम लंपास केली.
जुन्या रागातून टोळक्याने हातातील धारदार हत्यारे हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. तसेच पार्क केलेल्या सुमारे २२ वाहनांची तोडफोड केली. (Pune News ) या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी रोहित गायकवाड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दोरकर करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी पुणे दौऱ्यावर