Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sad News : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 October 2023, 12:50

Sad News  : पुणे : आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी अर्पण करणारे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. नेरूळ (नवी मुंबई) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातारकर यांचे पार्थिव आज दुपारी ३ नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येईल. उद्या (शुक्रवारी, ता. २७) संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्याकाळी दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतले. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी वेचले. (Sad News ) रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचे व्रत होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचे प्रबोधन केले.

विठ्ठलाचे कीर्तन आणि ज्ञानेश्वरी यावर बाबा महाराजांनी आयुष्य घालवले. बाबा महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त जमत होते. अलिकडे वय झाल्यामुळे बाबा महाराज कीर्तनासाठी उभे राहात नव्हते. त्यांची ही परंपरा त्यांचा नातू पुढे नेत आहे. (Sad News ) दरम्यान, यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचे निधन झाले होते. त्यानंतर ८ महिन्यांतच बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.

आई-वडिलांकडून मिळाले संस्काराचे धडे
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या घरात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा जोपासली जात आहे. बाबा महाराजांनी हीच परंपरा पुढे सुरू ठेवली. बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांच्याकडून बाबा महाराज सातारकरांनी परमार्थाचे धडे घेतले. (Sad News ) बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादा महाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. तेथूनच त्यावर कीर्तनाचे संस्कार रुजत गेले. वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांनी पुरोहित बुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Sad News : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

Shirur Sad News : रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युत तारेला चिटकून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू ; शिरूर तालुक्यातील घटना..

Pune Sad News : चिमण्यांना दाणे टाकायला गच्चीवर गेला आणि अनर्थ घडला ; १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; मावळातील घटना!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात DJवरून वाद चिघळला; नागपुरात विश्वास नांगरे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, आता थेट कारवाई?

Thursday, 3 September 2026, 15:21

मंदिरात लग्न नंतर वाद अन् दिव्यांग बायकोला हॉटेलवर नेऊन ‘तसल्या’ अवस्थेत आक्षेपार्ह व्हिडीओ; पुण्यात तडीपार नवऱ्याला अटक

Thursday, 3 September 2026, 15:16

पुण्यात कॅमेऱ्यासमोरच विद्यानंद बापट यांच्या कानाखाली मारली; हल्लेखोर म्हणाला, ‘त्याला आणखी मारणार!’ पहा व्हायरल Video

Thursday, 3 September 2026, 14:32

केडगावमध्ये जवाहरलाल विद्यालयाच्या गेटसमोर तुफान राडा ; 12 वीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याकडून हल्ला ; 10 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल..

Thursday, 3 September 2026, 13:36

इंदापुरात मराठा समाजाचं रास्ता रोको! पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा; प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 13:23

हिंजवडीसह 7 गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thursday, 3 September 2026, 13:18
Next Post

Big News : राज्यातील सहकारी साखर कारखानदारांना हंगाम सुरू होण्यापूर्वीच मोठा झटका; ४५ साखर कारखाने बंद करण्याचे आदेश;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp