Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे जिल्ह्यात राजकीय नेत्यांना बंदी; २८ तारखेला होणार कॅन्डल मार्च; मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर यांची माहिती…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 26 October 2023, 11:28

Pune News : पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात साखळी उपोषण सुरू करण्यात येत असून, या सर्व घडामोडी लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यात राजकीय नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय मराठा क्रांती समन्वयकांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तर २८ तारखेला शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  मराठा क्रांती समन्वयकांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राजकीय नेत्यांना बंदी..

यावेळी राजेंद्र कुंजीर म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत सरकारने पाळली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्या सर्व घडामोडी दरम्यान पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पुणे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील बाजूस साखळी उपोषणाला बसले आहेत. तसेच राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेतेमंडळींना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि जिल्ह्यात देखील राजकीय नेत्यांना बंदी घालण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा मार्फत घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी राजकीय नेत्यांचे कार्यक्रम आणि बैठका असतील, त्या ठिकाणी आम्ही काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

तसेच ते पुढे म्हणाले की, २८ तारखेला सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. तसेच आम्हाला आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारने केवळ तारखा दिल्या आहेत. पण निर्णय काही घेतले नाही. त्यामुळे आम्ही आता मागे हटणार नसल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरमध्ये अंत्यविधीसाठी कमरेभर पाण्यातून वाट! पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेल्याने ग्रामस्थांची मोठी कसरत

Tuesday, 1 September 2026, 9:00

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Tuesday, 1 September 2026, 8:33

चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू…

Tuesday, 1 September 2026, 8:27

सप्टेंबरची सुरुवातच पावसाने! महाराष्ट्रात आज कुठे बरसणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या अंदाज

Tuesday, 1 September 2026, 8:12

Daily Horoscope: 1 सप्टेंबरचा मंगळवार ठरणार लकी! या राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रगतीची मोठी संधी

Tuesday, 1 September 2026, 7:43
Next Post

Yavat News : सहजपूर येथे अपंगांसाठी ब्लॅंकेट वाटप अन् स्नेहभोजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp