Pune News : पुणे : कसबा पेठेतील साततोटी चौकात भुयारी मेट्रो स्थानकाचे काम करणाऱ्या कामगारांना धमकावून त्यांच्याकडील २० हजारांची रोकड लुटल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वाजिद वाहिद खान (वय २७, रा. लेबर कॅम्प, मुंढवा) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खान, त्याचे सहकारी मित्र अमोल गुजर, जनार्दन यादव हे पवळे चौकातील उपाहारगृहात चहा प्यायला गेले होते. (Pune News) तेथून ते साततोटी चौकातील भुयारी मेट्रो स्थानकाकडे निघाले असता, रस्त्यात एकाने त्यांना धक्का दिला. तसेच त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तेथून जाणारी रिक्षा थांबवून तिघांना पवळे चौकाकडे घेऊन गेले आणि चोरटा आणि साथीदाराने त्यांना चाकूचा धाक दाखविला.
दरम्यान, तेथील एका दुकानात खान, गुजर, यादव यांना नेले. (Pune News) धमकावून ऑनलाइन पद्धतीने २० हजार ३०० रुपये दुकानदाराकडे जमा करण्यास सांगितले. दुकानदाराकडून २० हजार ३०० रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मांजरे करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हुंड्यासाठी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
Pune News : खडकी येथे नदीपात्रात तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Pune News : ललित पाटीलच्या जीवाला धोका, कधीही एन्काऊंटर होऊ शकतो? शिवसेना नेत्याच्या विधानाने खळबळ