Pune Crime | पुणे : रेशनिंग दुकानदारांचा काळा बाजार उजेडात आला आहे. गोरगरिबाच्या तोंडचा घास हिसकावून बेकायदा रेशनिंगचे धान्य विकत घेत ते बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन निघालेल्या तिघांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 3 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी 2700 किलो तांदळाच्या 54 गोण्या जप्त केल्या आहेत. भवानी पेठेतील कासेवाडी येथे मंगळवारी (ता. 11)) ही खडक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
जावेद लालू शेख (वय-35), अब्बास अब्दुल सरकावस (वय-34) आणि इम्रान अब्दुल शेख (वय-30) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई महेश जाधव यांनी तक्रार केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कासेवाडी परिसरात रेशनिंग दुकानातील अन्नधान्याचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कासेवाडीतील राजीव गांधी सोसायटीच्या समोर रस्त्यावर उभा असलेला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो ताब्यात घेतला. त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातील सुमारे 2700 किलो तांदूळ घेऊन ते बाजारात विक्रीसाठी निघाले होते.
दरम्यान, पोलिसांनी टेम्पो आणि तांदूळ, असा एकूण 3 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक काळे अधिक तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pachgani | पाचगणी पोलीसांना ”बिर्ला शक्ती सिमेंट” ने भेटस्वरुपात दिले बॅरिकेड्स