Pune Crime News | पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 26 वर्षीय तरुणीवर लग्नाचे खोटे आमिष दाखवत बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर तरुणी यातून गर्भवती राहिली असता तिचा थेरगाव येथील एका रुग्णालयात गर्भपात करण्यात आला आहे.
तसेच, या तरुणीशी विवाह न करता दुसऱ्याच तरुणीशी विवाह करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या घटनेनतंर परिसरात एकच संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार २०१९ ते जानेवारी २०२३ या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी एका २६ वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानूसार, सुजित दत्तात्रय मोरे (वय २५, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्याच मुलीशी विवाह…
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रादार व तरुणीची ओळख झाली त्यानंतर त्याने तरुणीस लग्नाचे खोटे आमिष दाखवले. तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून तरूणी गर्भवती राहिल्यानंतर तिने लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने घरचे कारण देऊन गर्भपात केला.
त्यानंतर काही दिवसांनी त्याने दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. हा प्रकार समजल्यानंतर या तरुणीच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानतंर तरुणीने तात्काळ पोलीसात धाव घेतली व तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
अधिकाऱ्याबद्दल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ अंगलट; पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन
Hadapsar News :साहेब मी जाऊन येतोय,म्हणत हडपसर पोलीस ठाण्यातील एक अधिकारी अचानक झाला गायब