( Pune Crime News ) पुणे : पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘आत्मंथन’ येथे पाहुण्या आलेल्या अमेरिकी महिलेचे (american) चोरीला गेलेले ५ हजार ९४३ अमेरीकी डॉलरचा शोध लावण्यात पौड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. या डॉलर्सची भारतीय रुपयांमध्ये सुमारे चार लाख सत्याऐंशी हजार तीनशे सव्वीस रुपये इतकी किंमत आहे.
विजयसिंग वीरेंद्र सिंग पटोई (रा. मुंबई, टीटवाला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत भालचंद्र श्रीधर जाधव यांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीबी जमीना करीम, (रा. अमेरीका, न्युयॉर्क, गयाना सिटी) या २५ फेब्रुवारी रोजी पळसे येथील आत्मंथन येथे पाहुण्या म्हणुन आल्या होत्या. मुक्कामा दरम्यान त्यांच्याकडचे ५ हजार ९४३ अमेरीकी डॉलर चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी व्यवस्थापनाला कळवली.
पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी तात्काळ सदर ठिकाणी भेट देऊन तपासपथक नेमुन घटनेचा तपास करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या होत्या. तपासा दरम्यान कामास असलेला विजयसिंग वीरेंद्र सिंग पटोई याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने चोरी केलीची कबुली दिली. त्याच्याकडून ५ हजार ९४३ डॉलर आरोपी विजय पटोई याच्याकडून हस्तगत करण्यात आले.
महिलेने मानले पौड पोलिसांचे आभार…!
दरम्यान, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार बुधवारी (ता.८) करीम यांना त्यांचे अमेरिकी डॉलर परत करण्यात आले. अवघ्या दहा-बारा दिवसांत चोरीचा तपास, न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करुन चलन परत केल्या बद्दल करीम यांनी पौड पोलिसांचे आभार मानले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक पुणे विभाग मितेश गट्टे, हवेली विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील, पोलिस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, सहायक उपनिरीक्षक संतोष कुंभार, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, पोलीस नाईक नामदेव मोरे, दत्तात्रय अर्जुन, पोलीस कॉन्स्टेबल साहिल शेख, आकाश पाटील, अक्षय यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Crime News : घरफोडी ! लोहगावमधील बंद बंगला फोडला ; सव्वा लाखांचा ऐवज लंपास
Pune Crime News : तुझी बायको तुला सांभाळता येत नाही का’ असे बोलल्याने तरुणाला बेदम मारहाण ;