Pune Accident | शिरूर, (पुणे) : कुठलेही रक्ताचे नाते नव्हते अथवा एकमेकांचे पैपाहुने अथवा भावभावकी नव्हती.. तरीही लहाणपणीच मैत्रीची नाळ जुळली .. जनु मैत्रीचे धागे नियतीने इतके घट्ट विनले की, शेवटच्या क्षणापर्यंत हम साथ साथ हे म्हणण्यापर्यंत.. लहाणपणी न कळत एकमेकाना अंतर देणार नाही हे वचन घेणाऱ्या शिरूर मधील दोघे तरूण दोन वाहनांच्या मधे चिरडून (Pune Accident) जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
कंटनेरवर दूचाकी आदळून अपघात…
पुणे – नगर रस्त्यावर न्हावरे फाट्याजवळ (ता. शिरूर) शनिवारी (ता. १८) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगातील मद्यधुंद मोटारचालकाने दूचाकीला मागून ठोकरल्याने, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरवर दूचाकी आदळून हा अपघात झाला.
नीलेश हैबती थिटे (वय- २९) व शिवाजी अरूण जवळगे (वय- २९, रा. दोघही प्रितम प्रकाश नगर, शिरूर) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.
याप्रकरणी प्रताप बबनराव महाजन (रा. राव्हेन्यू काॅलनी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरूर पोलिसांनी मोटारचालक विजय बाळासाहेब रानवडे (रा. कारेगाव, ता. शिरूर) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, या अपघातातील नीलेश थिटे व शिवाजी जवळगे हे शालेय जीवनापासून एकमेकांचे जीवलग मित्र होते. येथील प्रितम प्रकाश नगरमध्ये शेजारी राहण्यास होते. महाविद्यालयीन शिक्षणानंतर दोघेही एकत्र मिळून कुरिअर व इतर छोटी – मोठी कामे करीत होते. जवळगे याचे कुरिअरचे काम असल्याने काल सायंकाळी दोघे कारेगाव येथे गेले होते. तेथील काम आटोपून ते दूचाकीवरून शिरूरला घरी येत होते.
दरम्यान, न्हावरे फाट्याजवळील हॉटेल शिवनेरीसमोर नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मोटारीने त्यांच्या दूचाकीला मागील बाजूने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दूचाकीवरील ताबा सुटून ती रस्त्याकडेला उभ्या असलेल्या गॅस वाहतूकीच्या कंटेनरवर आदळली.
त्यात दोघांनाही गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघानंतर, थिटे व जवळगे यांच्या मित्रमंडळींसह प्रितम प्रकाश नगर मधील तरूणांची अपघातस्थळी मोठी गर्दी झाली. विजय रानवडे या मद्यधुंद मोटार चालकाला पकडून तरूणांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.
दरम्यान, लहानपासुन नियतीने बांधलेली मित्रत्वाची नाळ नियतीने अपघातानंतरही तुटु दिली नाही. जनु जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी असा नारा देत नियतीने दोघांनाही एकाचवेळी आपल्या बाहुपाशात घेतले. मृत तरूण वास्तव्यास असलेल्या प्रितम प्रकाश नगर परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Accident News : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात ; चालकाचा मृत्यू
Manjari Crime : मांजरी येथील झोमॅटो डिलव्हरी बॉयचा हांडेवाडी चौकात अपघाती मृत्यू