Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident | त्या दोघांची दोस्ती जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी ; पुणे – नगर रस्त्यावर न्हावरे फाट्याजवळ अपघात, दोन जिवलग मित्रांचा जागेवरच मृत्यू..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 March 2023, 15:58

Pune Accident | शिरूर, (पुणे) : कुठलेही रक्ताचे नाते नव्हते अथवा एकमेकांचे पैपाहुने अथवा भावभावकी नव्हती.. तरीही लहाणपणीच मैत्रीची नाळ जुळली .. जनु मैत्रीचे धागे नियतीने इतके घट्ट विनले  की, शेवटच्या क्षणापर्यंत हम साथ साथ  हे म्हणण्यापर्यंत.. लहाणपणी न कळत एकमेकाना अंतर देणार नाही हे वचन घेणाऱ्या शिरूर मधील दोघे तरूण दोन वाहनांच्या मधे चिरडून (Pune Accident) जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

कंटनेरवर दूचाकी आदळून अपघात…

पुणे – नगर रस्त्यावर न्हावरे फाट्याजवळ (ता. शिरूर) शनिवारी (ता. १८) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगातील मद्यधुंद मोटारचालकाने दूचाकीला मागून ठोकरल्याने, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटनेरवर दूचाकी आदळून हा अपघात झाला.

नीलेश हैबती थिटे (वय- २९) व शिवाजी अरूण जवळगे (वय- २९, रा. दोघही प्रितम प्रकाश नगर, शिरूर) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.

 

याप्रकरणी प्रताप बबनराव महाजन (रा. राव्हेन्यू काॅलनी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरूर पोलिसांनी मोटारचालक विजय बाळासाहेब रानवडे (रा. कारेगाव, ता. शिरूर) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, या अपघातातील नीलेश थिटे व शिवाजी जवळगे हे शालेय जीवनापासून एकमेकांचे जीवलग मित्र होते. येथील प्रितम प्रकाश नगरमध्ये शेजारी राहण्यास होते. महाविद्यालयीन शिक्षणानंतर दोघेही एकत्र मिळून कुरिअर व इतर छोटी – मोठी कामे करीत होते. जवळगे याचे कुरिअरचे काम असल्याने काल सायंकाळी दोघे कारेगाव येथे गेले होते. तेथील काम आटोपून ते दूचाकीवरून शिरूरला घरी येत होते.

दरम्यान, न्हावरे फाट्याजवळील हॉटेल शिवनेरीसमोर नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मोटारीने त्यांच्या दूचाकीला मागील बाजूने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दूचाकीवरील ताबा सुटून ती रस्त्याकडेला उभ्या असलेल्या गॅस वाहतूकीच्या कंटेनरवर आदळली.

त्यात दोघांनाही गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघानंतर, थिटे व जवळगे यांच्या मित्रमंडळींसह प्रितम प्रकाश नगर मधील तरूणांची अपघातस्थळी मोठी गर्दी झाली. विजय रानवडे या मद्यधुंद मोटार चालकाला पकडून तरूणांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव करीत आहेत.

दरम्यान, लहानपासुन नियतीने बांधलेली मित्रत्वाची नाळ नियतीने अपघातानंतरही तुटु दिली नाही. जनु जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी असा नारा देत नियतीने दोघांनाही एकाचवेळी आपल्या बाहुपाशात घेतले. मृत तरूण वास्तव्यास असलेल्या प्रितम प्रकाश नगर परिसरावर दुःखाचे सावट पसरले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Accident News : मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात ; चालकाचा मृत्यू

Manjari Crime : मांजरी येथील  झोमॅटो डिलव्हरी बॉयचा हांडेवाडी चौकात अपघाती मृत्यू

Pune Accident : लाडक्या लेकीला पोलीस करायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्यात आलेल्या बापाचा अपघातात मृत्यू

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

Crime News | कुख्यात गुंड निलेश घायवळचे फ्लेक्स लावणे पडले महागात ; तिघांवर गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.