SEX RACKET शिर्डी : शिर्डीत ६ हॉटेलवर छापे टाकून पोलिसांनी हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा (SEX RACKET) पर्दाफाश शुक्रवारी (ता.५) रात्री केला आहे. (SEX RACKET) या छाप्यात पोलिसांनी १५ पीडित महिलांची सुटका करून ११ जणांना ताब्यात घेतले आहे. (SEX RACKET) हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे. (SEX RACKET) हि कारवाई श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने केली आहे. (SEX RACKET)
श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीत अनेक हॉटेलमध्ये अशा प्रकारे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक मिटके यांना मिळाली होती. शुक्रवारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिटके यांनी रात्री शिर्डीमध्ये सापळा रचून हॉटेलवर कारवाई केली. मिटके यांनी त्यांच्या पथकासह सहा ठिकाणी छापे टाकून १५ पीडित महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. तर ११ जणांना ताब्यात घेतले आहे
दरम्यान, शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सुरु असलेल्या हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. प्रतिष्ठित व्यक्तींच्या हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे इतर हॉटेलवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच, अनेकांनी व्यावसायिकांनी हॉटेल बंद केले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चार महिलांची सुटका, वाकडमधील प्रकार…