Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Koregaon Mul News : कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीचे लाखो रुपये पाण्यात, संवर्धनाअभावी लावलेली झाडे जळण्याच्या मार्गावर…

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 6 May 2023, 18:27

हनुमंत चिकणे 

उरुळी कांचन, (पुणे)  Koregaon Mul News : कोरेगाव मूळ (ता. हवेली)  Koregaon Mul News  ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गायरान परिसरात लावलेली लाखो रुपयांची झाडे पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. (Koregaon Mul News)

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. झाडे जगवणे ही काळाची गरज असून, शासनाकडून दरवर्षी वृक्ष लागवडीवर लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु वृक्ष संगोपन होत नसल्याकारणाने, पावसाळ्यात लावलेली झाडे  एप्रिल मेच्या पहिल्या आठवड्यातच पाणी न दिल्याने जळून जाण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत.

कोरेगाव मूळ गायरान परिसरात मागील चार वर्षापूर्वी झाडे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला. यासाठी ८० हजार रुपये खर्च करून पाण्याची ड्रीप करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील पाणी दिले आहे. मात्र पाणी सोडण्याअभावी ही झाडे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने ही झाडे जळून जाण्याच्या मार्गावर असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच ही झाडे जळून अथवा सुकलेल्या अवस्थेत दिसून आल्यास जिल्हा परिषद कार्यालयाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचेही पुणे प्राईम न्यूजशी बोलताना सांगितले.

 

दरम्यान, याबाबत काही नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीचे कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी यांना याबाबत माहिती दिली असता, तेवढ्यापुरते त्या व्यक्तीचे समाधान करून पहिले पाढे पंचावन हीच परिस्थिती सध्या सुरु आहे. मागील दीड महिन्यांपासून सदर झाडांना पाणी मिळाले नाही. उरुळी कांचन येथील ग्रामस्वच्छता ग्रुप आठ दिवसाला येथील झाडांना येऊन पाणी घालीत आहेत. ग्रामपंचायतीने चार वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च केला आहे. मात्र ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यांच्या नियोजनाअभावी झाडे जळून चालली असल्याचा आरोप कोरेगाव मूळ येथील नागरिक करीत आहेत.

याबाबत बोलताना कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र जगताप म्हणाले, सदर झाडांना आठवड्यातून एकदा पाणी सुरु आहे. कर्मचारी कामात असल्याने एखाद्या आठवड्यात पाणी दिले नसेल मात्र झाडांना आठ दिवसाला पाणी सुरु आहे.

उरुळी कांचन येथील ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप याला अपवाद..!

पावसाळा आला की, दरवर्षी ‘झाडे लावा झाडे जगवा’ ही घोषणा देत शासनाकडून, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था, ग्रुपच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येते. परंतु संगोपनाची जबाबदारी कोणीही घेत नाही. त्यामुळे ही झाडे उन्हाळ्यात पाण्याअभावी जळून जातात. परंतु याला अपवाद उरुळी कांचन येथील ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप आहे. मागील अनेक वर्षापासून झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन, भर उन्हाळ्यात नेटके नियोजन करत झाडे जगवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय, अभियंता, नोकरदार, व शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Uruli Kanchan News : हिंगणगाव – खामगाव टेक येथील जलसमाधी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती ; लोणीकंद पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मध्यस्थीला यश..

Uruli Kanchan : कौतुकास्पद..! उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिराची विद्यार्थिनी श्रद्धा इनामे इंग्रजी विषयाच्या ऐंट्रन्स परीक्षेत राज्यात प्रथम..

Uruli Kanchan : उरुळी कांचन व परिसरातील तरुणांनी वाचविले कत्तलीसाठी जाणाऱ्या ४ गोवंशाचे प्राण ; लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त..

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मांजरी खुर्द येथे जमिनीच्या वादातून मोठा राडा! ‘घर खाली कर नाहीतर…’ धमकी देत तरुण अन् वडिलांना दगडाने बेदम मारहाण

Tuesday, 22 September 2026, 19:25

होणाऱ्या नवऱ्याच्याच हाती लागले तिचे नको ते फोटो; इंस्टाग्रामचं फेक अकाउंट, ब्लॅकमेल अन् पैशांची मागणी…

Tuesday, 22 September 2026, 18:41

गणेश विसर्जनात कोर्टाची कडक एंट्री! ढोल-ताशांचा ‘टोल’ अन् फटाक्यांवर थेट बंदी

Tuesday, 22 September 2026, 18:33

धर्मेंद्र प्रधान पायउतार, आता शिक्षणमंत्री अभिजित दीपकेंच्या निशाण्यावर; FIR ने राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 22 September 2026, 18:16

लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात मुसळधार पावसाची दमदार हजेरी; पिकांना जीवनदान मिळाल्याने बळीराजा सुखावला..

Tuesday, 22 September 2026, 17:57

पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली तरी रोहित पवार आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम! २६ ऐवजी आता २७ सप्टेंबरला होणार आंदोलन

Tuesday, 22 September 2026, 17:56
Next Post

SEX RACKET : शिर्डीत ६ हॉटेलवर छापे टाकून पोलिसांनी केला हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; ११ जणांना अटक तर १५ पीडित महिलांची सुटका...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp