Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यशवंत बचाव कृती समितीच्या आरोपांना रविवारी सभेत पुराव्यांसह उत्तर देणार; अध्यक्ष सुभाष जगताप यांचा दावा

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 25 September 2026, 11:13

लोणी काळभोर : “यशवंत कारखाना सुरू करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. कारखाना सुरू करताना अनेक प्रशासकीय आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, त्यातून मार्ग काढत प्रशासकीय अडचणी सोडविण्याचे काम सुरू आहे. ज्यांनी यापूर्वी स्वतः 117 एकर जमीन विक्रीचा ठराव मंजूर केला होता, तेच आता जमीन विक्रीला विरोध करीत आहेत. तसेच दौंड तालुक्यातील काही मयत सभासदांच्या खोट्या सह्या केल्याचा आरोपही केला जात आहे. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून त्यात तथ्य नाही. रविवारच्या सभेत या सर्व आरोपांना पुराव्यांसह उत्तर देऊ,” असे दावा कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी केला आहे.

यशवंत सहकारी साखर कारखान्याची 43 वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, 27 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता सोरतापवाडी येथील कला गोविंद लॉन्स येथे होणार आहे. सभेच्या विषयपत्रिकेत कारखान्याच्या आर्थिक स्थितीपासून जमीन व्यवहार, जुन्या व नवीन प्लांटचे भवितव्य आणि थकीत देणी यासंदर्भातील महत्त्वाचे विषय ठेवण्यात आले आहेत.

49.18 एकर जमीन विक्रीचा मुद्दा केंद्रस्थानी

सभेच्या विषयपत्रिकेतील कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांना विक्री केलेल्या 49.18 एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीची नोंद घेण्याचा विषय महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय कारखाना सुरू करण्यासाठी नवीन अत्याधुनिक साखर प्लांट उभारण्याबाबत धोरण निश्चित करणे आणि त्यासाठी संचालक मंडळाला अधिकार देण्याचा प्रस्तावही सभेपुढे आहे. जुन्या कारखाना प्लांटबाबत पुढील धोरण निश्चित करण्यासाठी संचालक मंडळाला अधिकार देण्याचाही विषय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कारखाना नेमक्या कोणत्या पद्धतीने पुन्हा सुरू करणार, त्यासाठी किती भांडवलाची आवश्यकता आहे आणि निधी उभारणीचा मार्ग काय असेल, याबाबत सभासदांकडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

 

जुन्या थकीत बिलांवरही सभासदांचा सवाल

सन 2010-11 आणि 2009-10 या गळीत हंगामातील थकीत ऊस बिलांबाबत चर्चा, तसेच कारखाना कामगारांची जुलै 2011 ते ऑगस्ट 2018 या कालावधीतील थकीत पगार व इतर देणी देण्याबाबतचे विषयही सभेत मांडले जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी सभासद आणि कामगारांची थकीत देणी कधी आणि कशा पद्धतीने दिली जाणार, यावर सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय स्टोअर विभागातील अस्तित्वात नसलेला माल, गोडावूनमधील खराब अथवा काळी कच्ची साखर, उपपदार्थ आणि जुने रेकॉर्ड निर्लेखित करण्यास मंजुरी देण्याचा विषयही सभेपुढे आहे. या विषयावरही सभासदांकडून माहिती मागितली जाण्याची शक्यता आहे.

‘यशवंत’च्या भवितव्यावर सभासद काय भूमिका घेणार?

यशवंत बचाव कृती समितीकडून विद्यमान कारभारावर विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जमीन विक्री, कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल, थकीत ऊस बिले, एफआरपी आणि कारखान्याच्या मालमत्तेबाबत पारदर्शकतेचा मुद्दा समितीकडून उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक भांडवल उभारणे आणि प्रशासकीय अडचणी दूर करणे आवश्यक असल्याची भूमिका कारखाना प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे रविवारच्या सभेत जमीन विक्रीचा विषय, थकीत देणी आणि कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या आराखड्यावरून आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष सुभाष जगताप यांनी पुराव्यांसह उत्तर देण्याचे जाहीर केल्याने, 27 सप्टेंबरची सभा ‘यशवंत’च्या भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार का? याकडे हवेली तालुक्यासह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 2025 मध्येही 117 एकर जमीन विक्रीच्या प्रस्तावावरून सभासदांमध्ये तीव्र मतभेद झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.

रविवारची सभा वादळी होणार?

हवेलीचे वैभव आणि हजारो शेतकरी सभासदांच्या भावनांशी जोडलेला थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा कारखाना प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, कारखाना सुरू करण्यासाठी 117 एकर जमीन विक्रीच्या मुद्द्यावरून विरोधक आणि संचालक मंडळ आमनेसामने आले असून, आरोप-प्रत्यारोपांनी रविवारच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी वातावरण तापले आहे. मयत सभासदांच्या कथित बनावट सह्यांपासून ते थकीत ऊस बिले, एफआरपी, जुना व नवीन साखर प्लांट आणि मशिनरीपर्यंत विविध मुद्दे सभेत गाजण्याची शक्यता आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54
Next Post

सोन्याच्या दराला पुन्हा झळाळी! अनंत चतुर्दशीला 24, 22, 18 कॅरेटचे भाव वाढले,पाहा आजचे भाव...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp