पुणे : गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच होते. अधूनमधून दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता, मात्र आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुवर्णनगरीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.दुसरीकडे, चांदीचे भाव मात्र कालच्याच पातळीवर स्थिर राहिले आहेत.

‘गुड रिटर्न्स’ने दिलेल्या माहितीनुसार, आज 25 सप्टेंबर 2026 रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा (10 ग्रॅम) 160 रुपयांनी वाढला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा 150 रुपयांची वाढ झाली असून, 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति तोळा 120 रुपयांची वाढ दिसून येत आहे. सध्या झालेली ही वाढ तुलनेने कमी असली, तरी आगामी सण-उत्सवांच्या काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे ताजे दर:

24 कॅरेट (शुद्ध सोने): 1 ग्रॅमचा दर 15,284 रुपये आहे, तर 8 ग्रॅमसाठी 1,22,272 रुपये मोजावे लागतील. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,52,840 रुपये नोंदवली गेली आहे.
22 कॅरेट (दागिन्यांचे सोने): 1 ग्रॅमचा भाव 14,010 रुपये असून,
8 ग्रॅमसाठी 1,12,080 रुपये मोजावे लागतील. 10 ग्रॅमचा दर 1,40,100 रुपयांवर पोहोचला आहे.
18 कॅरेट: १ ग्रॅम सोन्याची किंमत 11,463 रुपये, ८ ग्रॅमचा दर 91,704 रुपये आणि १० ग्रॅमचा दर 1,14,630 रुपये इतका आहे.
चांदीच्या दराबद्दल बोलायचे झाल्यास, आज बाजारात चांदीच्या किमतीत कोणतीही उलथापालथ झालेली नाही. सध्या 1 ग्रॅम चांदीचा दर 245 रुपये असून, 1 किलो चांदी खरेदी करण्यासाठी 2,45,000 रुपये मोजावे लागत आहेत. सणासुदीच्या दिवसांत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी या दरांची माहिती अत्यंत महत्त्वाची ठरेल.







