Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये टशन; डीजेचा दणदणाट, लेजर लाईटचा मारा अन् ट्रॅक्टरवर चढून तरुणांचा धांगडधिंगा, कारवाई कधी?

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 25 September 2026, 12:23

लोणी काळभोर : गणपती विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करून कर्णकर्कश डीजेचा दणदणाट आणि लेजर लाईटचा मारा केल्याचा प्रकार लोणी काळभोरमधील छत्रपती संभाजीनगर परिसरात समोर आला आहे. दोन गणेश मंडळांमध्ये ‘आपलाच आवाज मोठा’ अशी जणू स्पर्धाच रंगली होती. डीजेच्या तालावर तरुणांचा धांगडधिंगा, ट्रॅक्टरवर चढून सुरू असलेला जल्लोष आणि एकाच ठिकाणी अर्ध्या तासाहून अधिक काळ थांबलेली मिरवणूक यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.

गुरुवारी (ता. 24) विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन मंडळे एकाच ठिकाणी आल्यानंतर दोन्ही बाजूंनी मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यास सुरुवात केली. त्यात लेजर लाईटचाही वापर करण्यात आला. एकमेकांपेक्षा आपलाच डीजे मोठा असल्याचे दाखविण्याच्या नादात दोन्ही मंडळे बराच वेळ एकाच ठिकाणी थांबून राहिली. त्यामुळे मिरवणुकीचा मार्गही काही काळ ठप्प झाला.

याचदरम्यान काही तरुण ट्रॅक्टरवर चढून नाचत असल्याचे दृश्य दिसून आले. मोठ्या आवाजातील डीजे, लेजर लाईट आणि तरुणांचा धांगडधिंगा यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना निर्देश दिल्यानंतर वातावरण काहीसे शांत झाले आणि विसर्जन मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. मात्र, या संपूर्ण प्रकारावर पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई करण्यात आली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

लोणी काळभोरमध्ये मात्र कारवाई कुठे?

 

गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करून कर्णकर्कश डीजे वाजविणाऱ्या मंडळांवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल करून डीजे साहित्य जप्त केले आहे. पुणे शहरातील मोहम्मदवाडी आणि काळेपडळ परिसरात तर पोलिसांनी डीजे साहित्य आणि टाटा 709 ट्रक असा सुमारे 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. बारामती पोलिसांनीही सार्वजनिक मिरवणुका आणि उत्सवांमध्ये कर्णकर्कश डीजेचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे.

परवानगी असली तरी आवाजाची मर्यादा पाळणे बंधनकारक

डीजे किंवा ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी आवश्यक असते. परवानगी देताना वेळेची मर्यादा आणि ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमही लागू असतात. मात्र, परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष मिरवणुकीत आवाजाची मर्यादा पाळली जाते का, हा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडे घटनास्थळी कारवाई करण्याचे अधिकार आहेत. ध्वनीची पातळी तपासण्यासाठी डेसीबल मीटरचा वापर, पंचनामा आणि आवश्यक पुरावे संकलित करून पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाऊ शकते.

आयुक्तांच्या आदेशांची अंमलबजावणी कधी?

एकीकडे पुणे शहर पोलिसांकडून डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात कारवाईचा धडाका सुरू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, लोणी काळभोरमधील विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप असताना संबंधित मंडळांवर अद्याप ठोस कारवाई झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. मिरवणुकीदरम्यान पोलिस घटनास्थळी पोहोचले, कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आणि त्यानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली. मात्र, नियम धाब्यावर बसवून डीजेचा दणदणाट करणाऱ्या मंडळांवर गुन्हा दाखल होणार का? डीजे साहित्य जप्त केले जाणार का? की केवळ सूचना देऊन प्रकरण संपवले जाणार? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.

दरम्यान, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ध्वनीप्रदूषण आणि नियमभंगाबाबत कठोर भूमिका घेतलेली असताना लोणी काळभोरमध्ये त्याची अंमलबजावणी कितपत होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील या प्रकाराची पोलिस प्रशासन दखल घेऊन संबंधितांवर काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31

अलिबागच्या लॉजवर तरुणाचा गूढ अंत! होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला, पण घडलं भयंकर; मृत्यूचं गूढ वाढलं!

Friday, 16 October 2026, 17:54
Next Post

गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य ; नृत्यांगनांसह डीजे मालक, मंडळाच्या तिघांवर गुन्हा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp