पुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट 2026 या महिन्याच्या आर्थिक लाभासाठी राज्य शासनाकडून निधी वितरणाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे रखडलेला हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासकीय निर्णयानुसार, अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र लाभार्थी महिलांसाठी एकूण 339,14 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. हा निधी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी वापरला जाणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. निधीची ही रक्कम अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आली आहे.

सध्या महिलांमध्ये ऑगस्ट महिन्यात 3000 रुपयेचा हप्ता मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार शासन निर्णयात प्रत्येक महिलेला 3000 दिले जातील असा कोणताही स्पष्ट उल्लेख नाही. जीआरमध्ये नमूद केलेली 3000 कोटींची रक्कम ही एका महिन्याचा हप्ता नसून संपूर्ण आर्थिक वर्षासाठी केलेली एकूण अर्थसंकल्पीय तरतूद आहे. त्यामुळे 3000 कोटींची तरतूद आणि वैयक्तिक लाभाची रक्कम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

दरम्यान योजनेअंतर्गत दरमहा 1500 चा नियमित लाभ दिला जातो. ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका किती रुपयांचा असेल आणि तो कोणत्या तारखेला खात्यात जमा होणार, याबद्दलची अधिकृत माहिती शासनाकडून लवकरच जाहीर केली जाईल.
सध्याच्या शासन निर्णयावरून केवळ निधी मंजूर झाल्याची खात्री मिळते. त्यामुळे लाभार्थी महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी.






