Pimpri News : पिंपरी : गोठ्यातील मुक्या जनावरांना काठीने बेदम मारहाण करून, त्यांचे पाय बांधून, त्यांच्यावर एक विकृत तरुण अनैसर्गिक अत्याचार करीत असल्याची धक्कादायक बाब चिखली परिसरातून उघडकीला आली आहे. जनावरांसोबत काहीतरी चुकीचे घडत असल्याच्या संशयावरून गोठामालकाने गोठ्यात सीसीटीव्ही लावले. त्यानंतर ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि विकृती करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले.
चिखलीतील धक्कादायक प्रकार
अधिक माहितीनुसार, रामकिशन श्रीरामभवन चौहाण (वय २४, सध्या रा. जाधववाडी, चिखली मूळगाव राणीपूर, महाराजगंज, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या विकृत तरुणाचे नाव आहे. (Pimpri News) याप्रकरणी गोठा मालकाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित गोठा मालक रात्रीच्या वेळी गोठ्यात जनावरे मोकळी सोडून घरी जात असे. मालकांचे जनावरांकडे विशेष लक्ष असे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून एक गोष्ट त्याच्या निदर्शनास आली, ती म्हणजे सकाळी गोठ्यात आल्यावर दीड वर्षांच्या एका जनावराचे पाय बांधलेले असायचे. (Pimpri News) यामुळे रात्रीच्या वेळी गोठ्यात कोणीतरी येत असून, जनावरांबाबत काहीतरी गैरवर्तन करत असल्याची शंका त्याला आली. १८ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर या कालावधीत तीन वेळा हा प्रकार घडला होता.
दरम्यान, नेमका प्रकार शोधून काढण्यासाठी गोठा मालकाने गोठ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतर ३ ऑगस्टच्या पहाटे गोठ्यातील लाईट बंद असल्याचे मालकाला त्याच्या नातेवाइकांनी कळविले. तत्काळ गोठा मालकाने गोठ्याची पाहणी केली असता, आतून कडी लावल्याचे निदर्शनास आले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे देखील कोणीतरी काढल्याचे समजले. (Pimpri News) त्यानंतर त्यांनी कॅमेऱ्याचे रेकॉर्डिंग ज्या मोबाईलमध्ये चित्रित होत होते, त्याची पाहणी केली असता, एक युवक गोठ्यात शिरत असल्याचे दिसले. आत गेल्यावर त्याने जनावरांना काठीने बेदम मारहाण केली, त्यांचे पाय बांधून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.
गोठा मालकाने परिसरातील अन्य सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, संबंधित तरुण एका इमारतीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला दिसला. पोलिसांत तक्रार दाखल केली असता, त्या इमारतीत शोध घेतल्यावर चौहाण आढळून आला. (Pimpri News) अधिक चैकशी केली असता, चौहाण याने अशाच प्रकारे अन्य काही गोठ्यांमध्ये जाऊन जनावरांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांसमोर दिली.
याप्रकरणी विकृत तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली असून, गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरीत वस्त्यांमधील घराला ‘गुगल प्लस कोड’
Pimpri News : जिल्ह्यात शुक्रवारपासून वृक्षालय अभियानाचा शुभारंभ
Pimpri News : “जनसंख्या वाढली पण माणूस हरवत चालला आहे!”:समाजसेवक अण्णा हजारे